मुंबई : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांच्या वेळेस शिवसेनेचे काही खासदार त्यांनी मंत्री म्हणून नको होते नेमके तेच लोकं पाडले गेले. अमरावतीमध्ये आनंदराव अडसुळ पडले, शिरुरमध्ये शिवाजी आढळराव पाटील, रायगड अनंत गीते पडले तसेच औरंगाबादमध्ये चंद्रकांत खैरे पडले असा दावा राज ठाकरेंनी केला आहे. तसेच काँग्रेसचा एक खासदार जो शिवसेनेत होता आणि काँग्रेसमध्ये गेला नेमका तोच खासदार निवडून आला असंही राज यांनी सांगितले.
राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीच्या निकालावरुन केंद्र सरकावर टीका केली असून ३७१ मतदारसंघात घोळ झाला त्यावर कोणी बोलत नाही अशी खंत व्यक्त केली आहे. ३७० कलमावर पेढे वाटले जात आहेत, पण ३७१ मतदारसंघात घोळ झाला त्यावर कोणी बोलत नाही असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. यावेळी राज ठाकरे यांनी सर्वात प्रथम जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका करत या सगळ्या लोकांना माज आला आहे असा संताप व्यक्त केला.
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांच्या वेळेस शिवसेनेचे काही खासदार त्यांनी मंत्री म्हणून नको होते नेमके तेच लोकं पाडले गेले, अमरावतीमध्ये आनंदराव अडसुळ पडले, आढळराव पाटील, अनंत गीते पडले… आणि काँग्रेसचा एक खासदार जो शिवसेनेत होता आणि काँग्रेसमध्ये गेला नेमका तोच खासदार निवडून आला.
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) August 9, 2019
भाजपचे लोक प्रत्येक निवडणुकीत त्यांच्या किती जागा निवडून येतील, याचा आकडा आधीच सांगतात. यांना इतका आत्मविश्वास येतो कुठून? आताही भाजपचं कोणीतरी म्हणालं आहे की आमच्या २५० जागा निवडून येतील. भाजपच्या इतक्या जागा निवडून येणार तर आम्ही काय उरलेल्या जागांवर गोट्या खेळायच्या का ?’ अशा शब्दात भाजपवर टीका केली आहे.
पुढे बोलताना त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावरही जोरदार टीका केली. माहिती अधिकार कायद्यावर बोलताना ठाकरे यांनी ‘मोदी यांना B.A. पास की नापास विचारलं म्हणून माहिती अधिकार कायदाच बदलला’ अशी टीका त्यांनी मोदी सरकारवर केली. तसेच माहिती आयुक्तांचा कार्यकाळ, त्यांचा पगार सरकारने ठरवायचा’ , असा कायदा पारित करून घेतला अस ठाकरे म्हणाले.
