
Reliance Power Share Price | मंगळवार, 21 जानेवारी 2025 रोजी रिलायन्स पॉवर लिमिटेड कंपनी शेअर्स पुन्हा फोकसमध्ये आला आहे. मंगळवारी रिलायन्स पॉवर कंपनी शेअर 1.23 टक्क्यांनी घसरून 40.28 रुपयांवर पोहोचला आहे. दरम्यान, रिलायन्स पॉवर लिमिटेड कंपनीबाबत महत्वाची अपडेट आली आहे.
रिलायन्स पॉवर लिमिटेड कंपनीने स्टॉक एक्सचेंजला फायलिंगमध्ये माहिती देताना म्हटले आहे की, ‘रिलायन्स पॉवर लिमिटेड कंपनीने सोमवार २० जानेवारी रोजी नीरज पारख यांची कंपनीचे नवे कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली केली. नीरज पारख यांची केलेली ही नियुक्ती 20 जानेवारी 2025 पासून लागू होणार असून कंपनीच्या संचालक मंडळाने निश्चित केलेल्या कार्यकाळासाठी असेल
कंपनीने काय म्हटले आहे?
रिलायन्स पॉवर लिमिटेड कंपनीने म्हटले आहे की, ‘रिलायन्स पॉवर लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाने नीरज पारख यांची कार्यकारी संचालक आणि सीईओ म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे. नीरज पारख २१ वर्षांपूर्वी जून २००४ मध्ये रिलायन्स इन्फ्रा कंपनीमध्ये सेंट्रल टेक्निकल सर्व्हिसेस टीममध्ये अतिरिक्त व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. मागील अनेक वर्षे नीरज पारख सातत्याने आव्हानात्मक भूमिका आणि जबाबदाऱ्या स्वीकारल्या आहेत.
रिलायन्स पॉवर शेअरची स्थिती
रिलायन्स पॉवर लिमिटेड कंपनी शेअर मागील १ वर्षात 8.15 टक्क्यांनी घसरला आहे. गेल्या सहा महिन्यांत शेअरने ४५ टक्के परतावा दिला आहे. मागील पाच वर्षांत रिलायन्स पॉवर शेअरने १९०० टक्के परतावा दिला आहे. रिलायन्स पॉवर लिमिटेड कंपनी शेअर्सची 52 आठवड्यांतील उच्चांकी पातळी 53.64 रुपये होती आणि शेअरची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 19.40 रुपये होती.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.