
Tata Steel Share Price | गुरुवार, 23 जानेवारी 2025 रोजी टाटा स्टील शेअर 0.84 टक्क्यांनी वाढून 130 रुपयांवर पोहोचला होता. आता टाटा स्टील कंपनी शेअर ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीच्या जवळ पोहोचला आहे. दरम्यान, सेंट्रम ब्रोकिंग फर्मने टाटा स्टील कंपनी शेअरसाठी तेजीचे संकेत दिले आहेत.
टाटा स्टील कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 1,62,723 कोटी रुपये आहे. टाटा स्टील कंपनी शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 184.60 रुपये होती, तर शेअरची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 122.62 रुपये होती.
टाटा स्टील कंपनी शेअरची ट्रेडिंग रेंज
1 जानेवारी 1999 रोजी टाटा स्टील लिमिटेड कंपनी शेअर 6.95 रुपयांवर ट्रेड करत होता. सध्या टाटा स्टील लिमिटेड कंपनी स्टॉक 130 रुपयांवर ट्रेड करतोय. शेअरची बुधवारची बंद किंमत 128.92 रुपये होती. गुरुवारी दिवसभरात टाटा स्टील शेअर 127.70 रुपये ते 130.49 रुपये या रेंजमध्ये ट्रेड करत होता. मागील एक वर्षात टाटा स्टील शेअर 122.62 रुपये ते 184.60 रुपये या रेंजमध्ये ट्रेड करत होता.
सेंट्रम ब्रोकिंग फर्म – टाटा स्टील शेअर टार्गेट प्राईस
सेंट्रम ब्रोकिंग फर्मने टाटा स्टील लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. सेंट्रम ब्रोकिंग फर्मने टाटा स्टील लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ कॉल सह 168 रुपये टार्गेट प्राईस निश्चित केली आहे. सेंट्रम ब्रोकिंगने जाहीर केलेली टार्गेट प्राईस सध्याच्या किंमतीपेक्षा ४० टक्क्यांनी अधिक आहे.
टाटा स्टील कंपनी शेअरने किती परतावा दिला
मागील ५ दिवसात टाटा स्टील कंपनी शेअरने 1.05% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात टाटा स्टील शेअर 8.26 टक्क्यांनी घसरला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 18.76 टक्क्यांनी घसरला आहे. मागील १ वर्षात टाटा स्टील शेअर 0.08 टक्के घसरला आहे. गेल्या ५ वर्षात टाटा स्टील शेअरने गुंतवणूकदारांना 168.93 टक्के परतावा दिला आहे. तसेच लॉन्ग टर्ममध्ये टाटा स्टील शेअरने 1,770.50 टक्के परतावा दिला आहे. मात्र YTD आधारावर टाटा स्टील शेअर 4.93% घसरला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.