28 April 2024 4:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट FD Interest Rate | पैशाने पैसा वाढवा! 1 वर्षाच्या FD वर या 3 बँक देत आहेत 7.75 टक्केपर्यंत व्याज, यादी सेव्ह करा HDFC Credit Card | तुमच्याकडे क्रेडिट कार्ड आहे? मग या 5 चुका टाळा, अन्यथा आर्थिक ट्रॅपमध्ये अडकाल Property Knowledge | फ्लॅट किंवा घर विकत घेण्याचा विचार आहे? या 4 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा पैसे-प्रॉपर्टी हातचं जाईल
x

Safe Investment | मेहनतीच्या पैशावर कोणताही धोका पत्करायचा नाही? या सुरक्षित गुंतवणूक योजना आहेत खुपच फायदेशीर

Safe Investment

Safe Investment | सुरक्षीत आयुष्य आणि भविष्यातील चिंता यासाठी प्रत्येक व्यक्ती आपली सध्यची जमापुंजी कुठेतरी गुंतवण्याचा प्रयत्न करत असतात. यासाठी अनेक जण शेअर मार्केटकडे धाव घेतात. मात्र हा पर्याय प्रत्येकाच्या सोईचा नाही. कारण यात फायदा दिसत असला तरी रिस्क मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे अनेक जण सुरक्षीत योजना शोधत असतात. तुम्ही देखील अशा प्रकारच्या सुरक्षीत योजनेचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण आज आम्ही तुम्हाला काही अशा योजनांची माहिती देणार आहोत ज्यात कमितकमी गुंतवणूक करुण तुम्हाला जास्त नफा मिळवता येईल.

किसान विकास पत्र
किसान विकास पत्र ही एक उत्तम आणि सुरक्षीत योजना आहे. यात पैसे गुंतवून तुम्हाला ६.९ टक्क्यांनी वार्षीक व्याज मिळेल. यात तुमचे पैसे दुप्पट व्हावेत असे तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी १०.४३ वर्षांचा कालावधी लागू शकतो.

पीपीएफ
पब्लिक प्रोविडंट फंड हा गुंतवणूकीचा अतीशय सोपा मार्ग आहे. अनेक मध्यमवर्गीय यात गुंतवणूक करत असतात. यातुन तुम्ही भविष्यासाठी मोठी रक्कम जमा करु शकता. यात वार्षीक ७.१ टक्के दराने कर्ज मिळते. तर यात पैसे दुप्पट होण्यासाठी १०.१४ वर्षे वाट पाहावी लागेल.

बॅंक एफडीमध्ये करा गुंतवणूक
RBI ने रेपो रेट वाढवला आहे. त्यामुळे कर्ज घेतलेल्यांना अधीक व्याज भरावे लागते. तसेच जर तुमचे पैसे एफडीमध्ये असतील तर तुम्हाला त्यावर ६ टक्के व्याज आहे. यात दुप्पट रक्कम मिळवण्यासाठी सध्याच्या व्याज दरानुसार तुम्हाला १२ वर्षे थांबावे लागेल.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र म्हणजेच NSC ही एक छोटी बचत योजना आहे. यात तुम्हाला ६.८ टक्के दराने वार्षीक व्याज मिळते. तर १०.५८ वर्षांत हे पैसे दुप्पट होतात.

एनपीएस टियर – २जी
राष्ट्रीय पेन्शन योजनेमार्फत तुम्हाला यात खाते खोलता येते. हे खाते शासकीय आणि प्रायवेट दोन्ही ठिकाणी काम करणारे कर्मचारी खोलू शकतात. यात पैसे दुप्पट होण्यास ७.२ वर्षांचा कालावधी लागतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Safe Investment These schemes are very profitable for investment 02 November 2022.

हॅशटॅग्स

#Safe Investment(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x