
FD Interest Rate | तुमच्यापैकी बऱ्याच व्यक्तींनी एफडी म्हणजे मुदत फेरीमध्ये पैसे गुंतवून निश्चित परतावा मिळवला असेल. बहुतांश बँका एफडीवर चांगले इंटरेस्ट प्रदान करतात. दरम्यान प्रत्येक बँक आपापल्या परीने वेगवेगळे इंटरेस्टदर ग्राहकांसमोर ठेवते. मिळणारे व्याजदर हे ठेवीदाराची रक्कम ठेव, वय आणि वेळ या सर्व गोष्टींवर अवलंबून असते. सध्या विविध बँकांनी विशेष प्रकारच्या मुदत ठेवी योजना सुरू केल्या आहेत.
विशेष मुदत ठेवी योजनांमध्ये 400 दिवसांची एफडी 366 दिवस, 555 दिवस, 1111 आणि 3333 दिवसांच्या एफडीचा समावेश आहे. आज आपण हे जाणून घेणार आहोत की, एफडी गुंतवणुकीवर कोणती बँक किती प्रमाणात व्याजदर देते.
बँक ऑफ बडोदा :
400 दिवसांची एफडी : कमाल दर 7.30%. त्याचबरोबर एका वर्षासाठी 6.85%, 3 वर्षांसाठी 7.15% आणि पाच वर्षांसाठी 6.80% व्याजदर
बँक ऑफ महाराष्ट्र :
366 दिवसांसाठी : कमाल दर 7.45%. यामध्ये एका वर्षासाठी 6.75%, तीन वर्षांसाठी 6.50%, पाच वर्षांसाठी 6.50%.
बँक ऑफ इंडिया :
400 दिवसांसाठी : कमाल दर 7.30%. एका वर्षासाठी 6.80%, तीन वर्षासाठी 6.50% आणि 5 वर्षांसाठी 6%.
कॅनरा बँक :
3 ते 5 वर्षापर्यंत : कमाल दर 7.40%. एका वर्षासाठी 6.85%, तीन वर्षांसाठी 7.40% दर आणि 5 वर्षांसाठी 6.70% दर.
इंडियन बँक :
400 दिवसांसाठी इंडियन सुपर : कमाल दर 7.30%. एका वर्षासाठी 6.10%, तीन वर्षांसाठी 6.25% आणि पाच वर्षांसाठी देखील 6.25%.
स्टेट बँक ऑफ इंडिया :
444 दिवसांच्या अमृत वृष्टीवर : कमाल दर 7.25%. एका वर्षासाठी 6.80%, तीन वर्षांसाठी 6.75% आणि 5 वर्षांसाठी 6.50%.
युनियन बँक ऑफ इंडिया :
456 दिवसांसाठी : कमाल दर 7.30%. एका वर्षासाठी 6.80%, तीन वर्षांसाठी 6.70% आणि 5 वर्षांसाठी 6.50%.
आता आपण खाजगी बँकांचे व्याजदर तपासून घेऊ :
एचडीएफसी बँक : 55 महिन्याच्या कालावधीसाठी 7.40% दर देते.
येस बँक : 18 ते 24 महिन्यांसाठी 7.75% व्याजदर देते.
आयसीआयसीआय बँक : 15 महिने ते 2 वर्षांच्या कालावधीसाठी 7.75% व्याजदर दिले जाते.
अशा पद्धतीने तुम्ही विविध बँकांमध्ये एफडी गुंतवणूक करून सर्वोत्तम परतावा मिळवू शकता. आतापर्यंत बहुतांश व्यक्तींनी विविध बँकांमध्ये एफडी करून निश्चित परतावा त्याचबरोबर सुरक्षिततेची हमी मिळवली आहे. तुम्ही एफडी गुंतवणुकीतून केवळ व्याजदराने बक्कळ पैशांची कमाई करू शकता. तुमच्यापैकी बऱ्याच व्यक्ती म्हातारपणासाठी किंवा मुलांच्या शिक्षणासाठी देखील एफडी गुंतवणूक करतात.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.