18 January 2025 5:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला तुफान गर्दी, 10 टक्क्यांचा अप्पर सर्किट हिट, श्रीमंत करणार हा शेअर - Penny Stocks 2025 SBI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपये SIP वर मिळेल 1.26 कोटी रुपये परतावा IREDA Share Price | आता नाही थांबणार, इरेडा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: IREDA Honda Dio Vs TVS Jupiter 110 | होंडा Dio की TVS ज्युपिटर 110 पैकी कोणती स्कूटर बेस्ट आहे, फीचर्स व किंमती जाणून घ्या Income Tax Notice | पगारदारांनो, 'या' 9 कारणांमुळे तुम्हाला मिळू शकते इन्कम टॅक्सची नोटीस, असा करू शकता बचाव Motilal Oswal Mutual Fund | नोकरदारांची होतेय मजबूत कमाई, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स नोट करा
x

PAN 2.0 QR CODE | आता पॅन कार्ड होणार PAN QR CODE कार्ड; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, अपडेट नोट करा - Marathi News

PAN 2.0 QR CODE

PAN 2.0 QR CODE | पॅन कार्ड हे डॉक्युमेंट प्रत्येक व्यक्तीसाठी अत्यंत महत्त्वाचे असते. आधार कार्ड प्रमाणेच पॅन कार्ड हे एक महत्त्वाचे कागदपत्र आहे. शैक्षणिक तसेच इतरही शासकीय कामांसाठी पॅन कार्डची मागणी सर्वप्रथम केली जाते. याचं पॅन कार्डमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या केंद्रीय कॅबिनेटमध्ये सोमवारी हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. नेमकी काय आहे ही पॅन कार्डबद्दलची माहिती जाणून घ्या.

केंद्र सरकारचा कॅबिनेटमध्ये पॅन कार्ड 2.0 ला मिळाली मंजुरी :

केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णव यांनी मोदींच्या कॅबिनेटमध्ये पॅन कार्ड 2.0 बद्दल सर्व माहिती सांगितली आहे. ही बैठक सोमवारी पार पडण्यात आली असून लवकरच पॅन कार्डचा रचनेत मोठा बदल केला जाणार आहे. 2.0 हे पॅन कार्ड एका QR CODE प्रमाणे पाहायला मिळणार आहे. हे कार्ड प्रत्येक नागरिकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. कारण की सामान्य पॅन कार्डपेक्षा हे कार्ड जलद गतीने काम करणार आहे.

78 कोटी पॅन कार्ड लागू झाले :

देशामध्ये अजून सुद्धा निळ्या आकाशी रंगाचं पॅन कार्ड वापरलं जात आहे. हे पॅन कार्ड 1972 साली सरकारकडून लॉंच करण्यात आलं होतं. पॅन कार्ड 139A इन्कम टॅक्स सेक्शन अंतर्गत लागू केलं जातं. पॅन कार्ड संबंधीत देशातील नागरिकांवर लक्ष देण्यात आलं तर, अध्यापक 78 कोटी पॅन कार्ड लागू झाले आहेत. ज्यामध्ये 98% स्वतंत्रतेला कव्हर देण्याचे काम करत आहेत. 10 अंकी नंबर असलेला अल्फान्यूमरिक पॅन कार्ड इन्कम टॅक्स विभागाकडून लागू केले जाते.

QR कोड असणारे पॅन कार्ड मिळणार मोफत :

केंद्र  सरकारच्या घोषणेनंतर बऱ्याच व्यक्तींना नव्या पॅन कार्ड संबंधित विविध प्रश्न पडले होते. नवीन पॅन कार्डसाठी चार्जेस वसुलले जाणार का असा प्रश्न अनेकांना पडला होता. परंतु QR CODE असलेले पॅन कार्ड तुम्हाला अगदी मोफत मिळणार आहे. क्यूआर कोडच्या या पॅन कार्डमध्ये मोठा बदल झालेला पाहायला मिळणार आहे. ज्यामध्ये डिजिटल सर्व्हिस, त्याचबरोबर डेटा संबंधित अतिरिक्त सर्विस प्रदान करण्यात येणार आहे.

नवीन पॅन कार्ड बनवण्यासाठी मोदी सरकारला 1,435 कोटी रुपयांचा खर्च येणार असून लवकरात लवकर पॅन कार्ड 2.0 लागू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर अश्विन वैष्णव यांच्या म्हणण्याप्रमाणे पॅन कार्डचा वापर करत असणाऱ्या व्यक्तींना त्यांचं पॅन कार्ड बदलण्याची काहीही गरज नाहीये. करंजी नवीन पॅन कार्ड 2.0 हे सुधारित पॅन कार्डच्या आधारे प्रस्थापित केले जाणार आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | PAN 2.0 QR CODE 26 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#PAN 2.0 QR CODE(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x