29 April 2024 6:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

Paytm Share Price | पेटीएमचे शेअर्स कोसळले, कोणती बातमी गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढवतेय? हे कारण लक्षात ठेवा

Paytm Share Price

Paytm Share Price | One 97 Communications Ltd ही Paytm ची मुख्य कंपनी आहे. या कंपनीच्या शेअरची परिस्तिथी फार हलाखीची झाली आहे. जपानच्या प्रसिद्ध सॉफ्टबँक समूहाने एक मोठा निर्णय घेतला आहे. सॉफ्टबँक आपला Paytm कंपनीतील हिस्सा विकणार आहे. ही बातमी बाहेर येताच Paytm कंपनीचा स्टॉक कमालीचा कोसळला. सॉफ्टबँक सारख्या मोठ्या गुंतवणूक कंपनीने Paytm मधील स्टॉक विकण्याचा निर्णय घेतला आहे, आणि याच नकारात्मक बातमीमुळे या फिनटेक कंपनीचे शेअर्स कोसळले आहे. बीएसई इंडेक्सवर बाजार उघडताच Paytm कंपनीचे शेअर्स 9.19 टक्क्यांच्या घसरणीसह 546.25 रुपयांवर पडले होते.

Paytm तिमाही निकाल :
जेव्हा एखादी कंपनी आपला IPO बाजारात आणते तेव्हा अँकर गुंतवणूकदारांमार्फत काही भाग विकला जातो. हे असे गुंतवणूकदार असतात जे निश्चित लॉकइन कालावधीपूर्वी आपले शेअर्स विकू शकत नाहीत. जपानची सॉफ्ट बँक पेटीएमच्या अँकर गुंतवणूकदारांपैकीच एक आहे. सॉफ्ट बँकेची पेटीएममध्ये 12.9 टक्के गुंतवणूक आहे. पण आता Paytm चा लॉक-इन कालावधी संपल्यामुळे सॉफ्टबँकेने आपल्या गुंतवणूकीतील काही हिस्सा विकण्याचा निर्णय घेतला आहे. ही बातमी समोर येताच पेटीएम कंपनीच्या शेअर्समध्ये 10 टक्क्यांच लोअर सर्किट लागला होता. त्याचप्रमाणे लॉक-इन कालावधी संपल्यानंतर झोमॅटो कंपनीच्या शेअर्समध्येही 14 टक्क्यांची जबरदस्त घसरण पाहायला मिळाली होती. चालू आठवड्यातील मंगळवारी पेटीएम कंपनीच्या 86 टक्के शेअर्सचा लॉक-इन कालावधी पूर्ण झाला आहे.

सॉफ्टबैंक आपला हिस्सा विकणार :
सॉफ्टबैंकचे Paytm कंपनीत एकूण 12.9 टक्के शेअर्स आहेत, त्यापैकी ते 4.5 टक्के शेअर्सची विक्री करणार आहे. म्हणजेच सॉफ्ट बँक आगा 29 दशलक्ष शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहे. सॉफ्ट बँकेने हे समभाग विद्यमान गुंतवणूकदारांना 555 रुपये ते 601.45 रुपये या किमतीत ऑफर केले आहेत. जर या दराने विद्यमान गुंतवणूकदारांनी करार केला तर सॉफ्टबँकेला शेअर्स विक्री करून 1628.90 कोटी रुपये मिळतील. Paytm चे शेअर्स IPO लिस्टिंग प्राइसच्या तुलनेत 65 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत.

दुसऱ्या तिमाहीत कंपनीची कामगिरी :
जुलै ते सप्टेंबर 2022 या संपलेल्या तिमाहीत पेटीएम कंपनीला 473 कोटी रुपयेचा जबरदस्त तोटा सहन करावा लागला होता. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत Paytm कंपनीला 650 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला होता. Paytm कंपनीचे सीईओ विजय शेखर शर्मा यांनी आपल्या भागधारकांना लिहिलेल्या एका निवेदनात म्हंटले आहे की, कंपनी नफा कमावण्याच्या मार्गावर आहे. लवकरच कंपनी प्रॉफिट कमवायला सुरुवात करेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Paytm Share Price Lock-in Period has finished and Softbank has decided to sell their part of investment on 18 November 2022.

हॅशटॅग्स

#Paytm Share Price(79)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x