
SBI Saving Account | घरात ठेवण्यापेक्षा बँकेमध्ये आपले पैसे सुरक्षित रहावे यासाठी बहुतांश व्यक्ती सेविंग अकाउंट म्हणजेच बचत खाते उघडतात. बचत खात्यामध्ये तुम्ही तुम्हाला हवी तेवढी रक्कम जमा करून ठेवू शकता. तुम्ही नवीनच बचत खाते उघडण्याचा विचार करत असाल तर, इकडे तिकडे न जाता SBI च्या ‘बेसिक सेविंग्स बँक डिपॉझिट अकाउंट’ या बचत खात्यामध्ये खाते उघडा. BSBDA हे बचत खाते तुम्हाला जास्तीचा फायदा मिळवून देईल. सेविंग अकाउंटबद्दल जाणून घ्या.
मिनिमम बॅलन्स ठेवण्याची कोणतीही लिमिट नाही :
एसबीआय बँकेचे बेसिक सेविंग्स बँक डिपॉझिट अकाउंट हे बचत खाते खातेधारकांना एक अत्यंत आणि महत्त्वाची सुविधा उपलब्ध करतात. इतर बचत खात्यामध्ये तुम्हाला 0 बॅलन्सची सुविधा उपलब्ध करून दिली जात नाही. परंतु एसबीआयचे हे बचत खाते आपल्या ग्राहकांना 0 बॅलेन्स ठेवण्याची सुविधा देते. इतर बँकांमध्ये ठराविक शिल्लक रक्कम ठेवली नाही तर पेनल्टी चार्जेस घेतले जातात.
खाते ऍक्टिव्ह केल्यानंतर चार्जेस घेतले जात नाहीत :
इतर बँकांतील बचत खात्यामध्ये खाते ऍक्टिव्ह केल्यानंतर बँक चार्जेस आकारतात. परंतु एसबीआयच्या या बचत खात्यामध्ये अकाउंट ऍक्टिव्ह केल्यानंतर कोणत्याही प्रकारचे चार्जेस घेतले जात नाहीत. एवढंच नाही तर तुमचे झिरो बॅलन्स खाते बंद करताना देखील तुमच्याकडून चार्जेस आकारले जात नाहीत.
मोफत मिळणाऱ्या गोष्टी :
SBI च्या बचत खात्यात खातं उघडणाऱ्या खातेधारकांना भरपूर मोफत सुविधा मिळतात. ज्यामध्ये मोबाईल इंटरनेट बँकिंग सुविधा, डेबिट कार्ड, NEFT/RTGS यांसारख्या चैनलवर कोणत्याही प्रकारचे एक्स्ट्रा चार्जेस द्यावे लागत नाहीत. एसबीआयच्या या सेविंग खात्यामध्ये एका महिन्यात 4 कॅश विड्रॉल मोफत करू शकता. दरम्यान या बचत खात्यामध्ये तुम्हाला चेक बुकची सुविधा उपलब्ध करून दिली जात नाही. तुम्हाला चेक बुक हवं असेल तर तुमच्याकडून चार्जेस आकारले जातात.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.