Home Loan Interest Rate | पगारदारांनो, ‘या’ बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार

Home Loan Interest Rate | प्रत्येक व्यक्ती आपल्या घराची स्वप्नपूर्ती साकार करण्यासाठी दिवस रात्र एक करतो. तुमच्यापैकी बऱ्याच जणांचे हक्काचे घर खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण झाले असेल. परंतु असे शेकडो व्यक्ती आहेत जे अजूनही स्वस्त व्याजदरात कर्ज मिळवून आपल्या घरातच स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा मनामध्ये ठेवत आहेत.

सर्वसामान्य व्यक्तीसाठी घर खरेदी करणे हा अत्यंत महत्त्वाचा विषय असतो. वाढती महागाई लक्षात घेता आणि घरांच्या वाढत्या किंमती पाहता सामान्य व्यक्ती डायरेक्ट घर खरेदी करू शकत नाही. काही व्यक्ती बजेट नसल्यामुळे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करू शकत नाही परंतु बँकेतून कर्ज काढून घर घेण्याचा पर्याय उत्तम ठरू शकतो. आज आम्ही भारत देशातील टॉप 4 बँकांविषयी माहिती सांगणार आहोत तुम्हाला या बँकांतून कमीत कमी व्याजदराचे गृहकर्ज उपलब्ध होईल.

या बँका देतात सर्वांत स्वस्त गृह कर्ज :
1. तसं पाहायला गेलं तर, देशात विविध अशा बँका आहेत ज्या कमी व्याजदरात गृह कर्ज उपलब्ध करून देतात. परंतु या बँकांमधून बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र या दोन बँक सर्वाधिक स्वस्त गृह कर्ज उपलब्ध करून देतात.

2. आणखीन एक बँक आहे जी सर्वाधिक कमी व्याजदरात गृह कर्ज उपलब्ध करून देते. ती बँक म्हणजे युनियन बँक ऑफ इंडिया. सध्या युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र या दोन्ही बँका 8.10% दराने गृह कर्ज देत आहेत. हे व्याजदर इतर बँकांपेक्षा फार कमी आहे.

3. समजा तुम्हाला बँक ऑफ महाराष्ट्र आणि बँक ऑफ इंडियाकडून गृह कर्ज घ्यायचे नसेल आणि गृह कर्जासाठी तुम्ही दुसरा पर्याय शोधत असाल तर, बँक ऑफ बडोदा आणि पंजाब नॅशनल बँक हे दोन पर्याय देखील फायद्याचे ठरू शकतात.

4. बँक ऑफ बडोदा आणि पंजाब नॅशनल बँकेत गृह कर्जासाठी 8.15% दरानुसार गृह कर्ज देणे सुरू आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही या निवडक बँकांतील गृह कर्जाच्या व्याजदराविषयीची संपूर्ण माहिती घेऊन घराची स्वप्नपूर्ती साकार करू शकता.