11 May 2025 6:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

नाशिकच्या रस्त्यावर धावणार 'पिंक ऑटो'

Nashik, Nashik Pink Auto, Nashik Pink Auto Rickshaw

नाशिक : शहरातील महिलांना स्वयंपूर्णतेकडे नेण्यासह त्यांना प्रवासात सुरक्षेची हमी देणाऱ्या पिंक रिक्षा नवी दिल्ली, मुंबई, पुण्यानंतर आता नाशिक शहरातील रस्त्यावरही धावणार आहेत. स्थायी समितीच्या माजी सभापती हिमगौरी आहेर-आडके यांच्या महत्वाकांक्षी योजनेला मूर्त स्वरूप आले असून, महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून शहरातील महिलांना रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण व परवाने दिले जाणार आहेत.

यामुळे किती तरी गरजू महिलांना रोजगार मिळणार आहे. तसेच कित्येक महिलांचा प्रवास आता सुरक्षित होणार आहे. शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्याने महिला व विद्यार्थिनींकडून प्रवासासाठी खाजगी रिक्षाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. परंतु या रिक्षांमधून प्रवास करताना महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

रिक्षाच्या बहाण्याने महिलांवर छेडछाड जाण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळेच पिंक रिक्षा नावाची संकल्पना पुढे आली. दरम्यान ही महिलांसाठी एक सुरक्षित अशी वाहन सेवा असेल व ती चालवणाऱ्या सुद्धा महिलाच असणार आहेत. यासाठी महिलांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पिंक रिक्षा या संकल्पनेमुळे महिलांची सुरक्षितता हा प्रश्न थोडा का होईना पण सुटेल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Nashik(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या