9 May 2024 2:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 09 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 09 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या South Indian Bank Share Price | शेअर प्राईस 27 रुपये! स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआउट, लवकरच मोठा परतावा देईल Gold Rate Today | खुशखबर! आज अक्षय्य तृतीयेच्या 2 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम झाला, नवे दर तपासून घ्या Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा! 1 महिन्यात दिला 41% परतावा, स्टॉक अप्पर सर्किटवर JP Associates Share Price | शेअर प्राईस रु.17, जेपी असोसिएट्स कंपनीबाबत चिंता वाढवणारी अपडेट, स्टॉक Sell करावा? Yes Bank Share Price | येस बँकेबाबत नवीन अपडेट आली, थेट शेअर्सला किती फायदा होणार? स्टॉक Buy करावा?
x

पद्मसिंह पाटील यांच्याबाबत प्रश्न विचारताच पत्रकार परिषदेत भडकले शरद पवार

NCP MP padamsinh patil, Osmanabad, MP Sharad Pawar

श्रीरामपूर: मागील अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीतून अनेक नेते पक्ष सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहेत. खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्यामागोमाग चित्रा वाघ, मधुकर पिचड, संदीप नाईक, शिवेंद्रराजे भोसले, वैभव पिचड अशा अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे तर सातारचे खासदार उदयनराजे भोसले, पद्मसिंह पाटील, राणा जगजितसिंह पाटील, कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडीक हेदेखील भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. तर छगन भुजबळ हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीआधीच एनसीपीला अनेक धक्के सहन करावे लागत आहे.

एनसीपी’मधून पक्ष सोडून अनेक नेते भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातली जनता हे चित्र पाहतेच आहे. अशावेळी एनसीपीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना पद्मसिंह पाटील यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला असता आणि नातेवाईक असा उल्लेख केला असता ते चांगलेच संतापलेले पाहण्यास मिळाले. श्रीरामपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना एका पत्रकाराने शरद पवार यांना पद्मसिंह पाटील जे तुमचे नातेवाईक आहे तेही तुमची साथ सोडून जाण्याच्या तयारीत आहेत असं कळतं आहे असं पत्रकाराने विचारताच शरद पवार चांगलेच संतापले. राजकारणात नातेवाईकांचा काय संबंध? तुम्ही चुकीचं बोलत आहात, असं बोलणार असाल तर मला या पत्रकार परिषदेला कशाला बोलवायचं? माफी मागा, राजकारण आणि नातेवाईक यांचा काय संबंध? असा प्रश्न शरद पवारांनी विचारला आणि ते पत्रकार परिषद सोडून जाऊ लागले. इतक्यात त्यांना इतर पत्रकारांनी बसवलं आणि प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला शांत बसण्यास सांगितलं.

एनसीपीमधून सध्या अनेक नेते पक्ष सोडून जात आहेत. राष्ट्रवादीला लागलेली ही गळती काही थांबायचं नाव घेत नाहीये. सध्या अनेक दिग्गजांची नावंही चर्चेत आहेत. त्यामुळे एनसीपीचे बडे नेते जिथे जातील तिथे त्यांना त्याबाबतचा प्रश्न हमखास विचारण्यात येतोच. श्रीरामपूरच्या दौऱ्यावर असलेल्या शरद पवारांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषेद एका पत्रकाराने पवारांना तुमच्या जवळचे अनेक नेते पक्ष सोडून जात आहेत, तुमचे अनेक नातेवाईक असेलेल नेतेही पक्ष सोडत आहेत असा प्रश्न विचारला.

हॅशटॅग्स

#NCP(372)#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x