28 April 2024 7:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

चांद्रयान २: इतिहास घडणार! आज मध्यरात्री चंद्रावर फडकणार तिरंगा

Mission Chandrayan 2, vikram lander lunar surface

बेंगळुरू: चंद्रस्पर्शासाठी चांद्रयानाप्रमाणेच सारे देशवासियही आतुर झाले आहेत. चांद्रयान-२ चे लँडर असलेले ‘विक्रम’ चांद्रभूमीवर उतरण्यासाठी उद्या, शनिवारपासून पूर्वप्रयत्न सुरू करणार आहे. चंद्रावर सुरक्षितरीत्या उतरण्यासाठी या मोहिमेतील हा सर्वात अखेरचा टप्पा असणार आहे. याची सुरुवात शनिवारी पहाटे होणार आहे.

जवळपास दीड महिन्यापूर्वी म्हणजेच २२ जुलै रोजी श्रीहरिकोटा येथील केंद्रावरून झेपावलेले चांद्रयान-२ अनेक महत्त्वाचे टप्पे पार पाडत अखेर चंद्राजवळ पोहोचले आहे. चंद्रापासून अवघ्या ३५ किलोमीटरवर असलेले महत्वकांशी चांद्रयान-२ शनिवारी पहाटे १.३० ते २.३० च्या दरम्यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरून इतिहास रचेल. यानाचे लँडिंग झाल्यावर दोन तासांनी म्हणजे ५.३० ते ६.३० च्यादरम्यान विक्रम लँडरमधून प्रग्यान रोव्हर बाहेर पडेल. हा काळ शास्त्रज्ञांसाठी आव्हान ठरणार आहे.

  1. तुम्हीही होऊ शकता या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार;
    इस्त्रोच्या अधिकृत वेबसाइटवर चांद्रयान 2 लँडिंगचे लाइव्ह स्ट्रीमिंग दाखविण्यात येईल.
    प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरो (PIB) च्या यू-ट्युब पेजवरून लाइव्ह स्ट्रीमिंग दाखवलं जाईल.
    दूरदर्शनच्या सर्व चॅनेलवर याचं लाइव्ह टेलिकास्ट करण्यात येईल
  2. चंद्रावरील पाण्याबाबत मिळणार उपयुक्त माहिती
    चंद्र कसा बनला आणि विकसित झाला याची काही माहिती उपलब्ध आहे. मात्र चंद्राची उत्पतीबाबत आणखी जास्त माहिती घेणे गरजेचे आहे. चंद्रावर पाणी असल्याचे पुरावे चांद्रयान 1 ने मिळविले होते आता चांद्रयान 2 चा उद्देश चंद्रावरील एकूण भागात किती आणि कुठे कुठे पाणी आहे? या भागात खनिज आहे का? कोणते डोंगर आहेत का? तेथील मातीची विशेषता काय? चंद्रावर भूकंप होतो का? अशी माहिती शोधली जाणार आहे.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x