अ‍ॅशेस कसोटी क्रिकेट मालिकेत ऑस्ट्रेलियाने चौथ्या सामन्यात इंग्लंडला १८५ धावांनी धूळ चारली. जागतिक कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत अग्रस्थानी विराजमान असलेल्या पॅट कमिन्सने रविवारी लौकिकाला साजेशी कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने प्रतिष्ठेचा अ‍ॅशेस करंडक त्यांच्याकडेच राखून पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. २०१७ च्या अ‍ॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाने ४-० असे यश मिळवले होते.

ऑस्ट्रेलियाने टीम पेनच्या नेतृत्वाखाली हा सामना जिंकला आणि मालिकेत आघाडी घेतली. या विजयामुळे तब्बल १८ वर्षांनी ऑस्ट्रेलियासाठी एक सुखद योगायोग जुळून आला. २००१ साली स्टीव्ह वॉ च्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाच्या संघाने इंग्लंडमधून अ‍ॅशेस ट्रॉफी स्वत:कडे आणण्यात यश मिळवले होते. त्याचप्रकारे टीम पेन ने यंदा इंग्लंडमध्ये स्पर्धा सुरू असताना ट्रॉफी आपल्याकडे राखण्यात यश मिळवले आहे.

इनिंगच्या सुरुवातीला इंग्लंडच्या जो डेनली (५३ रन) आणि जेसन रॉय (३१ रन) यांनी तिसऱ्या विकेटसाठी ६६ रनची पार्टनरशीप केली. पण पॅट कमिन्सने जेसन रॉयला आणि बेन स्टोक्सला माघारी पाठवलं आणि इंग्लंडच्या अडचणी वाढवल्या. यानंतर डेनलीने जॉनी बेयरस्टो (२५ रन) सोबत ४५ रनची पार्टनरशीप केली. मिचेल स्टार्कने बेयरस्टोची विकेट घेतली. यानंतर जॉस बटलर (३४ रन) आणि क्रेग ओव्हरटन (२१ रन) यांनी सातव्या विकेटसाठी ३४ रन केले. हेजलवूडने बटलरची विकेट घेऊन ऑस्ट्रेलियाला विजयाजवळ नेलं.

रविवारी २ बाद १८ धावांवरुन सुरुवात करणाऱ्या इंग्लंडला अखेरच्या दिवशी केवळ १७९ धावाच करता आल्या. ओक्सीच्या भेदक माºयापुढे इंग्लंडचे सर्वच प्रमुख फलंदाज ढेपाळले. पहिल्या डावात दिमाखदार द्विशतक ठोकणाºया स्टिव्ह स्मिथला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

बटलरची विकेट गेल्यानंतर इंग्लंडच्या शेवटच्या ३ विकेट झटपट गेल्या. जोफ्रा आर्चरला नॅथन लायनने १ रनवर आणि जॅक लीचला लेबुशानने आऊट केलं. हेजलवूडने ओव्हरटनची विकेट घेतल्यानंतर मॅच ऑस्ट्रेलियाने जिंकली. स्टुअर्ट ब्रॉड शून्य रनवर नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या, तर हेजलवूड आणि नॅथन लायनला प्रत्येकी २-२ विकेट मिळाल्या. मिचेल स्टार्क आणि मार्नस लेबुशानने प्रत्येकी १-१ विकेट घेतली.

ऑस्ट्रेलियाचा ऍशेसवर कब्जा, इंग्लंडला १८५ रननी लोळवलं