26 March 2023 5:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PPF Scheme Balance | खुशखबर! PPF मध्ये पैसे गुंतवणाऱ्यांच्या खात्यात 31 मार्चला पैसे ट्रान्सफर होणार, अधिक जाणून घ्या Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरची 2023, 2024, 2025, 2030 मध्ये टार्गेट प्राईस किती असेल? तज्ज्ञांचं मत पहा आता निरव मोदी, ललित मोदी आणि मेहुल चोक्सी भारतात परतून स्वतःला OBC नेते घोषित करतील, भाजप त्यांचं स्वागत करेल - रवीश कुमार Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव धडाम झाले, पटापट तुमच्या शहरातील आजचे नवे दर तपासून घ्या SBI Bank mPassbook | पासबुक अपडेटसाठी आता SBI बँकेत जाण्याची गरज नाही, असं करा सहज ऑनलाईन अपडेट CIBIL Score | कर्जाचा EMI थकवल्याने डिफॉल्ट झाल्यावरही सिबिल स्कोर कसा सुधारू शकता पहा SIP Calculator | अशी SIP करा म्हणजे 4 वर्षांनंतर 15 लाख रुपयांची कार खरेदी करू शकाल, संपूर्ण गणित पहा
x

वाढदिवशी शुबमनकडून साराला नाही मिळालं हवं ते गिफ्ट | नेटिझन्सला दिली 'ट्रोल' संधी

IPL 2020, Shubhaman Gill, Sara Tendulkar

अबुधाबी, १३ ऑक्टोबर : आयपीएलच्या 13 व्या हंगामातील 28 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने कोलकाता नाईट रायडर्सचा 82 धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना बेंगलोरने 2 बाद 195 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल कोलकाताला 20 षटकांत केवळ 119 धावा करता आल्या. या सामन्यात कोलकाताचा युवा सलामीवीर शुबमन गिल काही खास कामगिरी करू शकला नाही. त्याने 25 चेंडूत 34 धावा केल्या.

काही दिवसांआधी चांगली कामगिरी केल्यामुळे महान फलंदाज सचिन तेंडुलकरची मुलगी साराने शुबमनला शुभेच्छा दिल्या होत्या. त्यामुळे नेटकऱ्यानी शुबमनचे नाव साराशी जोडले होते. मात्र सोमवारी (12 ऑक्टोबर) साराचा वाढदिवस असतानाही त्याने केलेल्या खराब कामगिरीमुळे चाहत्यांनी या दोघांनाही चांगलेच ट्रोल केले आहे.

या सामन्यात आरसीबीचा धडाकेबाज फलंदाज एबी डिविलियर्सने 33 चेंडूत 73 धावांची स्फोटक खेळी केली. त्याने या खेळीत 6 षटकार आणि 5 चौकार लगावले. डिविलियर्सच्या या खेळीमुळेच आरसीबीला 195 धावा करता आल्या.

या विजयासह आरसीबी गुंतालिकेत तिसऱ्या स्थानावर आला आहे. या संघाचा पुढील सामना गुरुवारी (15 ऑक्टोबर) पंजाबशी होणार आहे. पंजाबविरुद्ध विजय मिळवून आरसीबी प्लेऑफ मध्ये जाण्याच्या मार्गावर पुन्हा एक पाऊल टाकेल.

 

News English Summary: Royal Challengers Bangalore defeated Kolkata Knight Riders by 82 runs in the 28th match of the 13th season of the IPL. Batting first after winning the toss, Bangalore scored 195 for two. In reply, Kolkata could score only 119 runs in 20 overs. Kolkata’s young opener Shubman Gill did not do well in this match. He scored 34 off 25 balls. A few days back, Sara, daughter of great batsman Sachin Tendulkar, congratulated Shubman for his good performance. So the netizens had linked Shubman’s name to Sara Tendulkar.

News English Title: Shubhaman Gill to Sara Tendulkar after scoring 35 runs in 25 balls on her birthday sports updates.

हॅशटॅग्स

#IPL2020(28)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x