1 December 2022 9:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Limit | खासगी नोकरदारांना आता 25000 रुपये पेन्शन मिळणार, तुमचे पैसे 333 टक्क्यांनी असे वाढणार पहा ITR Filling | तुमची यामार्गे सुद्धा कमाई होते का? इन्कम टॅक्सची नोटीस येऊ शकते, टॅक्स भरावा लागणार Quick Money Share | झटपट पैसा! या शेअरने 3 महिन्यांत 147 टक्के परतावा दिला, वेगाने पैसे वाढवत आहे हा स्टॉक, नोट करा Money From IPO | हा IPO दुसऱ्या दिवशी 6 पट सबस्क्राइब झाला, ग्रे मार्केटमध्ये 55 रुपयांचा प्रीमियम, मोठ्या कमाईचे संकेत Equity Mutual Fund | इक्विटी फंडात पैसे गुंतवता? चांगले फंड कसे निवडावे आणि खराब फंडमधून कधी बाहेर पडावे? जाणून घ्या Talathi Bharti 2022 | राज्यात 4122 जागांसाठी तलाठी महाभरती, त्वरित ऑनलाइन अर्ज करा PCMC Recruitment 2022 | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 285 पदांची भरती, पटापट अर्ज करा
x

IPL 2020 | विराट - डिविलियर्सची जोडीच वरचढ, गाठला पहिला नंबर

De Villiers, Virat Kohli, partnership, IPL run

अबुधाबी, १३ ऑक्टोबर : IPL 2020 Points Table युएईमध्ये सुरू असलेल्या आयपीएलच्या १३वा हंगाम अर्धा झाला आहे. स्पर्धेतील पहिला टप्पा पूर्ण झाला असून प्रत्येक संघाचे ७ सामने झाले आहेत. स्पर्धेत दोन संघांची सर्वाधिक चर्चा होत आहे. पहिला संघ म्हणजे चेन्नई सुपर किंग्ज होय जो गुणतक्त्यात शेवटून दुसऱ्या स्थानावर आहे तर दुसरा संघ म्हणजे दिल्ली कॅपिटल्स जो दुसऱ्या स्थानावर आहे.

इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या हंगामातील २८वा सामना सोमवारी (१२ ऑक्टोबर) झाला. शारजाहच्या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात झालेल्या या सामन्यात विराट कोहली आणि एबी डिविलियर्सच्या फलंदाजी जोडीने शानदार भागीदारी केली आहे.

झाले असे की, बेंगलोरने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी निवडली. सलामीला फलंदाजीसाठी आलेले देवदत्त पडिक्कल (२३ चेंडूत ३२ धावा) आणि ऍरॉन फिंच (३७ चेंडूत ४७ धावा) १३ षटकांच्या आत पव्हेलियनमध्ये परतले. त्यानंतर बेंगलोरचा कर्णधार कोहली आणि यष्टीरक्षक फलंदाज डिविलियर्सने तिसऱ्या विकेटसाठी जोरदार फटकेबाजी करत निर्धारित २० षटकात संघाचा स्कोर १९४ वर आणला.

कोहलीने नाबाद राहत एका चौकाराच्या मदतीने २८ चेंडूत ३३ धावा ठोकल्या. तर दूसऱ्या बाजूला डिविलियर्सने ३३ चेंडूत ७३ धावांचे मोलाचे योगदान दिले. यासह या फलंदाजी जोडीने आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच ३००० धावा करण्याचा विक्रम केला आहे.

त्यांच्यापुर्वी कोहली-ख्रिस गेलने मिळून आयपीएलमध्ये २७८२ धावांची भागिदारी रचली होती, तर डेविड वॉर्नर व शिखर धवन (२३५७ धावा) आणि रॉबिन उथप्पा व गौतम गंभीर (१९०६ धावा) या फलंदाजी जोडींनीही १५००पेक्षा जास्त धावा कुटल्या आहेत.

 

News English Summary: The 28th match of the 13th season of the Indian Premier League was played on Monday (October 12). The batting duo of Virat Kohli and AB de Villiers have put on a formidable partnership in the match between Royal Challengers Bangalore and Kolkata Knight Riders at Sharjah. Before him, Kohli and Chris Gayle had a combined partnership of 2782 runs in the IPL, while the batting duo of David Warner and Shikhar Dhawan (2357 runs) and Robin Uthappa and Gautam Gambhir (1906 runs) have also scored more than 1500 runs.

News English Title: The De Villiers Virat Kohli partnership has now accumulated 3000 IPL run sports updates.

हॅशटॅग्स

#IPL2020(28)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x