18 February 2025 9:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | खुशखबर, आता महिना अवघ्या 250 रुपयात म्युच्युअल फंडातून पैसा वाढवा, SBI जन-निवेश SIP योजना लाँच EPFO Pension Money | खाजगी कंपनी पगारदारांना महिना 7500 रुपये ईपीएफ पेन्शन मिळणार, अपडेट जाणून घ्या BEL Share Price | डिफेन्स शेअरबाबत तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर तेजीत, तज्ज्ञांकडून मोठे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: RELIANCE GTL Share Price | 1 शेअरवर 5 फ्री बोनस शेअर्स देणार ही कंपनी, जीटीएल कंपनी पेनी स्टॉक फोकसमध्ये Horoscope Today | मंगळवार 18 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा मंगळवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध राशी परिवर्तन, 22 फेब्रुवारीपासून या 3 राशींसाठी चांगला काळ सुरु होणार, तुमची राशी आहे का?
x

मुंबई मॅरेथॉन २०२० : १७व्या मुंबई मॅरेथॉन स्पर्धेला मोठा प्रतिसाद

Mumbai Marathon 2020

मुंबई: आशियातील सर्वात सर्वात मोठी व मानाचा ‘गोल्ड लेबल’ दर्जा मिळालेल्या मुंबई मॅरेथॉनला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. यंदाच्या मुंबई मॅरेथॉनमध्ये गतवर्षीच्या तुलनेत नऊ हजारांनी वाढलेली धावपटूंची संख्या नागरिकांमध्ये ‘फिटनेस’चे वाढलेले महत्त्व अधोरेखित करताना दिसत आहे. त्यात कडाक्याच्या थंडीला न जुमानता मुंबईकरांनी मोठ्या संख्येने मुंबई मॅरेथॉनला उपस्थिती लावली आहे. देश-विदेशातील नामांकित धावपटू विजेतेपद पटकावण्यासाठी सज्ज झाले असून यंदाही केनिया, इथियोपियाचे धावपटू यासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. मुंबई मॅरेथॉन टीमने ‘बी बेटर’ या थीमसह, घनकचरा व्यवस्थापनासाठी उचललेले विशेष पाऊल पाहता यंदाची ‘टीएमएम २०२०’ पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून या मॅरेथॉनला सुरुवात झाली आहे. तर वरळी डेअरी येथून अर्धमॅरेथॉनला सुरुवात झाली आहे. मुंबई मॅरेथॉनचे यंदाचे हे १७वे वर्ष असून, या प्रतिष्ठेच्या मॅरेथॉनमध्ये सुमारे ५५, ३२२ धावपटूंनी सहभाग निश्चित केला आहे. यामध्ये ९,६६० मुख्य मॅरेथॉन आणि १५ हजार २६० धावपटू अर्धमॅरेथॉनमध्ये सहभागी होती. त्याचप्रमाणे, खुली १०किमी रन (८,०३२), ड्रीम रन (१९,७०७), वरिष्ठ नागरिक रन (१,०२२), दिव्यांग (१,५९६) व पोलीस कप (४५ संघ) अशा इतर गटांमध्येही सहभागी झाले आहे.

भारतीयांमध्ये सेनादलाच्या श्रीनू बुगाथा आणि ऑलिम्पियन सुधा सिंग यांनी मुंबई मॅरेथॉनद्वारे टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतील आपली जागा निश्चित करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. अर्धमॅरेथॉनमध्ये राष्ट्रीय विक्रमवीर अविनाश साबळे आणि मोनिका आथरे तसेच स्वाती गाढवे विजेतेपद पटकावण्यासाठी उत्सुक होते.

 

Web Title:  Mumbai Marathon 2020 started in early morning.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Sports(20)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x