29 April 2024 7:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

साईबाबा जन्मस्थळाचा वाद; शिर्डी आजपासून बंद

Nashik Shirdi Saibaba Temple, Nashik Shirdi Saibaba Temple Bandh, Saibaba Birth place Controversy

शिर्डी: साईबाबांच्या जन्मस्थळाचा वाद निर्माण केल्याच्या निषेधार्थ शनिवारी मध्यरात्रीपासून शिर्डी शहर बेमुदत काळासाठी बंद करण्यात आले आहे. शिर्डी ग्रामस्थांनी शनिवारी रात्री झालेल्या ग्रामसभेत हा निर्णय घेतला. बंद काळात साईबाबा मंदिर उघडे राहणार असून, दुकाने, बाजार मात्र बंद राहतील. या बंदमध्ये पंचक्रोशीतील गावे सहभागी होणार आहेत.

पाथरी ही साईजन्मभूमी असल्याबाबतचे वक्तव्य मुख्यमंत्री मागे घेत नाहीत तोपर्यंत रविवारपासून शिर्डी बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला आहे. भाविक आपल्यासाठी देवच आहे, त्यांना कोणताही त्रास होणार नाही याची सर्वानी काळजी घ्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. बंदमधून जीवनावश्यक सेवा वगळण्यात आल्या असून, साई मंदिर सुरू राहणार आहे. पाथरीला निधी देण्यास विरोध नसून त्याचा साई जन्मभूमी उल्लेख करण्यास आमचा आक्षेप आहे, अन्य आठ जन्मस्थळाच्या दाव्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही, असे ग्रामसभेत सांगण्यात आले.

दरम्यान, साईबाबा समाधी मंदिरातील दर्शन, मंदिरातील सर्व आरत्‍या व सर्व धार्मीक विधी, संस्‍थानचे साईप्रसादालय, सर्व भक्‍तनिवासस्‍थाने, रुग्‍णालये या सुविधा ही नियमीत प्रमाणेच सुरु राहणार असल्याची माहिती शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.

 

Web Title:  Nashik Shirdi Saibaba Temple Bandh called by local Villagers in protest to Sai Birth actual place Controversy.

हॅशटॅग्स

#Nashik(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x