24 April 2024 11:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | IREDA शेअर्समध्ये गुंतवणूक फायद्याची ठरेल? तज्ज्ञांनी जाहीर केला सपोर्ट लेव्हल आणि रेझिस्टन्स लेव्हल Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत मोठी अपडेट आली, शेअर मोठ्या रॅलीसाठी सज्ज झाला, किती फायदा होईल? Bank Account Alert | महाराष्ट्रातील या बँकेत तुमचं खातं आहे? आता पैसे काढू शकणार नाही, RBI ने बंदी घातली IPO GMP | स्वस्त IPO शेअर आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागून मिळेल 113 टक्के परतावा, GMP चा धुमाकूळ Numerology Horoscope | 24 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 24 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Communication Share Price | टाटा कम्युनिकेशन्स शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर
x

अंगणवाडी सेविकांवर मेस्मा कायदा लावण्याचा युती सरकारचा डाव उधळला

मुंबई : अंगणवाडी सेविकांचं काम अत्यावश्यक सेवेत मोडत असल्याचे कारण पुढे करून त्यांचा संप उधळून लावण्याच्या दृष्टीकोनातून महिला आणि बालकल्याण विभागाने अंगणवाडी सेविकांना मेस्मा कायद्याच्या कचाट्यात आणले होते.

सध्या विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असल्याने विरोधकांनी भाजप-शिवसेना सरकारला चांगलेच धारेवर धरले होते. गेली दोन दिवसांपासून विरोधकांनी अंगणवाडी सेविकांवरील मेस्मा कायद्यावरून सभागृह अक्षरशः दणाणून सोडले होते. त्यानंतर विरोधकांच्या तिखट दबावानंतर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंगणवाडी सेविकांवरील मेस्माला स्थागिती देण्याचा निर्णय घेतला आणि तशी माहिती सभागृहाला दिली.

केवळ अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी संप करू नये आणि सरकारची पुन्हा नाचक्की होऊ नये म्हणूनच अंगणवाडी सेविकांना मेस्मा अंतर्गत आणून त्यांचा संप हाणून पाडण्याचा भाजप-शिवसेना सरकारचा डाव असल्याचा आरोप विरोधांनी केला होता. सभागृहात काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबरच सत्ताधारी शिवसेनेने सुद्धा सभागृहात त्याबद्दल आवाज उचलला होता. अखेर विरोधकांच्या त्या मागणीला यश आले आणि मुखमंत्र्यांनी विरोधकांची मागणी मान्य करत अखेर मेस्मा कायद्याला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला.

हॅशटॅग्स

#Mesma Law(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x