27 July 2024 4:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gratuity on Salary | खुशखबर! 35 हजार पगार असणाऱ्या खाजगी नोकरदारांना ग्रॅच्युइटी इतकी रक्कम मिळणार Railway Ticket Booking | रेल्वे प्रवाशांनो! जनरल कोट्यातून लोअर बर्थ सीट मिळवता येईल, माहित असणं गरजेचं आहे EPF Pension Money | 90% पगारदारांना माहित नाही, EPFO कडून 7 प्रकारच्या पेन्शन मिळतात, फायद्याची अपडेट Lakshmi Narayan Rajyog | लक्ष्मी-नारायण योग 'या' 3 राशींसाठी ठरणार अत्यंत शुभ, आर्थिक नशीब उजळवणार FD Investment Money | 1 वर्षाच्या रु.1,50,000 FD वर कोण अधिक रक्कम देईल? SBI, पोस्ट ऑफिस, HDFC की ICICI? Gold Rate Today | खुशखबर! सोनं खरेदीची योग्य वेळ, आज सोनं 5149 रुपयांनी स्वस्त झालं, भाव धडाम झाले Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यात दर महिना रु.20,050 येतील, महिना खर्चाची चिंता मिटेल
x

T20 World Cup 2022 | भारत विरुद्ध बांगलादेश सामना, भारतासाठी हा सामना महत्त्वाचा का आहे?

T20 World Cup 2022

T20 World Cup 2022 | टी-20 वर्ल्ड कपमध्ये आज भारताचा सामना बांगलादेशशी होणार आहे. ऑस्ट्रेलियातील अॅडलेड ओव्हल स्टेडियमवर दोन्ही संघांमधला हा सामना रंगणार आहे. हा सामना दुपारी दीडच्या सुमारास सुरू झाला आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट नेटवर्कच्या चॅनेलवर आणि वेगवेगळ्या मीडिया प्लॅटफॉर्मवर केले जाईल. वर्ल्ड कपमधील भारताचा हा चौथा सामना आहे.

टीम इंडिया हा सामना जिंकून वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये आपला दावा मजबूत करेल. याआधी खेळल्या गेलेल्या 3 पैकी 2 सामन्यात भारताने विजय मिळवला आहे, तर तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेच्या हातून पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. वर्ल्ड कपमध्ये भारताने पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात पाकिस्तान आणि नेदरलँडवर शानदार विजय मिळवला.

गुणतक्त्यात भारताचे स्थान
दक्षिण आफ्रिकेने गेल्या सामन्यात भारताचा पराभव केला आणि गट 2 मध्ये अव्वल स्थान गाठले. गट 2 मध्ये दक्षिण आफ्रिका 5 गुणांसह अव्वल स्थानावर आहे, तर भारत आणि बांगलादेशचे प्रत्येकी 4 गुण आहेत. पण नेट रनरेटमुळे भारत दुसऱ्या आणि बांगलादेश तिसऱ्या क्रमांकावर आहे.

हा सामना महत्त्वाचा का आहे
भारताला उपांत्य फेरी गाठायची असेल, तर बांगलादेशला 2 नोव्हेंबरला पराभूत व्हावं लागेल. याशिवाय झिम्बाब्वेलाही पराभूत करावे लागणार आहे. कारण ज्या संघाचे 8 गुण असतील तो संघ आधी सेमीफायनलमध्ये पोहोचणार आहे. भारताला बांगलादेशकडून पराभव पत्करावा लागला, तर त्यांना उपांत्य फेरी गाठणे कठीण जाईल. मग त्याला पाकिस्तानवर अवलंबून राहावे लागेल की, ६ नोव्हेंबरला पाकिस्तान बांगलादेशचा पराभव करतो. याशिवाय ६ नोव्हेंबरला झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यातही भारताला विजय मिळवावा लागणार असून झिम्बाब्वेला पराभूत करणे आवश्यक असणार आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: T20 World Cup 2022 India Vs Bangladesh cricket match LIVE updates check details 02 November 2022.

हॅशटॅग्स

#T20 World Cup 2022(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x