11 July 2020 12:26 PM
अँप डाउनलोड

#IPL२०१९ - मुंबईचा ‘सुपर’ विजय; प्ले-ऑफमध्ये प्रवेश

IPL 2019, Mumbai Indian

मुंबई : आयपीएलमध्ये तीन वेळा चॅम्पियन ठरलेल्या कर्णधार रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने ‘सुपर ओव्हर’मध्ये हैदराबादवर विजय मिळवत प्ले-ऑफमध्ये प्रवेश केला. हैदराबादने मुंबईपुढे सुपर ओव्हरमध्ये विजयासाठी ९ धावांचे आव्हान ठेवले होते. मुंबईने हे आव्हान लीलया पार केले आणि १३ सामन्यांमधून आठ सामन्यामध्ये विजय मिळवत १६ गुणांसह प्ले ऑफमध्ये स्थान मिळवले आहे. सामन्यात आणि सुपर ओव्हरमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जसप्रीत बुमराहला सामनावीर घोषित करण्यात आले.

BhagyaVivah Marathi Matrimonial

सुपर ओव्हरमध्ये मुंबईला विजयासाठी ६ चेंडूत ९ धावांची आवश्यकता होती. आक्रमक फलंदाज हार्दिक पांड्याने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला आणि पुढच्या २ चेंडूत ३ धावा काढत मुंबईला विजय मिळवून दिला. त्याआधी मुंबई इंडियन्सने दिलेल्या १६३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वृद्धिमान साहाने चांगली सुरुवात केली होती. पण साहा चौकार लगावण्याच्या प्रयत्नात १५ चेंडूत ५ चौकारांच्या मदतीने २५ धावा करून झेलबाद झाला. त्यानंतर सलामीवीर मार्टिन गप्टिलला १५ धावांवर बुमराहने पायचीत पकडले. त्यापाठोपाठ कर्णधार विल्यमसन कृणाल पांड्याच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. विजय शंकर १७ चेंडूत १२ धावा करून माघारी परतला. हैदराबादचे गडी बाद होत असताना मनीष पांडे आणि मोहम्मद नबीने फटकेबाजी करून सामन्यात रंगत आणली. शेवटच्या चेंडूवर ७ धावा हव्या असताना मनीष पांडेने षटकार लगावून सामना बरोबरीत सोडवला. त्यामुळे सामना सुपर ओव्हरपर्यंत गेला.

आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेतील महत्त्वपूर्ण लढतीत पाहुण्या हैदराबाद संघाने प्रथम फलंदाजी करणार्‍या मुंबईला १६२ धावांत रोखण्यात यश मिळविले. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. पण त्याचा हा निर्णय मुंबईला फारसा फायदेशीर ठरला नाही. हैदराबाद संघाने केलेली शिस्तबद्ध गोलंदाजी आणी सुरेख क्षेत्ररक्षण यामुळे मुंबईला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. मुंबईच सुरुवातदेखील खराब झाली. कर्णधार रोहित शर्मा २४ धावा काढून खलिल अहमदचा शिकार ठरला. त्याने १८ चेंडू खेळताना ५ चौकार मारले. त्यानंतर आलेल्या यादवने डिकॉकला चांगली साथ दिली. या दोघांनी दुसर्‍या विकेटसाठी अर्धशतकी भागिदारी करून मुंबईचा डाव सावरला.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Indian Cricket Team(74)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x