29 March 2024 6:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 30 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर?
x

IPL 2020 | पाहा सध्या कोण आहे ऑरेंज आणि पर्पल कॅपचा मानकरी

IPL 2020, Orange and Purple Cap, sports updates

अबुधाबी, १३ ऑक्टोबर : IPL 2020 Points Table युएईमध्ये सुरू असलेल्या आयपीएलच्या १३वा हंगाम अर्धा झाला आहे. स्पर्धेतील पहिला टप्पा पूर्ण झाला असून प्रत्येक संघाचे ७ सामने झाले आहेत. स्पर्धेत दोन संघांची सर्वाधिक चर्चा होत आहे. पहिला संघ म्हणजे चेन्नई सुपर किंग्ज होय जो गुणतक्त्यात शेवटून दुसऱ्या स्थानावर आहे तर दुसरा संघ म्हणजे दिल्ली कॅपिटल्स जो दुसऱ्या स्थानावर आहे.

आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला दिली जाते. तर पर्पल कॅप हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला दिली जाते. आयपीएल २०२० मधील २८ वा सामना सोमवारी (१२ ऑक्टोबर) शारजाह येथे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झाला. या सामन्यात बेंगलोरने ८२ धावांनी विजय मिळवला. हा बेंगलोरचा या हंगामातील पाचवा विजय आहे.

आत्तापर्यंत आयपीएलमध्ये २८ सामने झाले आहेत. २८ सामन्यांनंतर ऑरेंज कॅप किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार केएल राहुलकडे कायम आहे. तर पर्पल कॅप दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाकडे कायम आहे.

२८व्या सामन्यानंतर ऑरेंज कॅपच्या शर्यतीत असणारे ५ फलंदाज (आयपीएल २०२० मध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज)

  • केएल राहुल- ३८७ धावा, ७ सामने (किंग्स इलेव्हन पंजाब)
  • मयंक अगरवाल – ३३७ धावा, ७ सामने (किंग्स इलेव्हन पंजाब)
  • फाफ डु प्लेसिस – ३०७ धावा, ७ सामने (चेन्नई सुपर किंग्स)
  • डेविड वॉर्नर – २७५ धावा, ७ सामने (सनरायझर्स हैदराबाद)
  • जॉनी बेअरस्टो – २५७ धावा, ७ सामने (सनरायझर्स हैदराबाद)

२८ व्या सामन्यानंतर पर्पल कॅपच्या शर्यतीत असणारे ५ गोलंदाज (आयपीएल २०२० मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज)

  • कागिसो रबाडा – १७ विकेट्स, ७ सामने (दिल्ली कॅपिटल्स)
  • जसप्रीत बुमराह – ११ विकेट्स, ७ सामने (मुंबई इंडियन्स)
  • ट्रेंट बोल्ट – ११ विकेट्स, ७ सामने (मुंबई इंडियन्स)
  • राशिद खान – १० विकेट्स, ७ सामने (सनरायझर्स हैदराबाद)
  • युझवेंद्र चहल- १० विकेट्स, ७ सामने (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर)

 

News English Summary: The Orange Cap in the IPL is given to the player who scores the most runs in the season. The Purple Cap is given to the bowler who takes the most wickets in a season. The 28th match of IPL 2020 was played between Royal Challengers Bangalore and Kolkata Knight Riders in Sharjah on Monday (October 12). Bangalore won the match by 82 runs. This is Bangalore’s fifth win of the season. So far, 28 matches have been played in the IPL. After 28 matches, Orange Cap Kings XI Punjab captain KL Rahul retains. Purple Cap Delhi Capitals fast bowler Kagiso Rabada has retained.

News English Title: IPL  2020 orange and Purple Cap holder sports updates.

हॅशटॅग्स

#IPL2020(28)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x