3 March 2024 8:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल Multibagger Stocks | कुबेर कृपा आहे या शेअरवर! अवघ्या 2 आठवड्यात दिला 240 टक्के परतावा, खरेदी करणार? Penny Stocks | शेअरची किंमत 6 रुपये, रोज अप्पर सर्किट हिट करत 5 ते 10 टक्के परतावा मिळतोय Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 03 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या ICICI Bank Share Price | आयसीआयसीआय बँक शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही, पुढची मजबूत टार्गेट प्राइस जाहीर Vedanta Share Price | मार्ग श्रीमंतीचा! हा शेअर 50 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर Multibagger Stocks | श्रीमंत करणाऱ्या टॉप 10 शेअर्सची लिस्ट सेव्ह करा, दरवर्षी 100 ते 300 टक्के परतावा मिळतोय
x

IPL 2020 Live | CSK Vs MI | चेन्नईसाठी हा सामना करो या मरो

IPL 2020, Mumbai Indians, Chennai Super King, LIVE cricket match

मुंबई, २३ ऑक्टोबर: (IPL 2020) 13व्या मोसमातील 41 वा सामना आज खेळला जाणार आहे. हा सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध चेन्नई सुपर किंग्जस (Chennai Super Kings) यांच्यात खेळण्यात येणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. हा सामना शारजा आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यात चेन्नईसाठी विजय अत्यावश्यक असणार आहे. या सामन्यात चेन्नईचा पराभव झाला तर, चेन्नई या स्पर्धेतून बाहेर पडेल. त्यामुळे चेन्नईसाठी हा सामना ‘करो या मरोचा’ असणार आहे.

आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत मुंबई आणि चेन्नई एकूण 29 सामने खेळण्यात आले आहेत. या 29 सामन्यांपैकी 17 सामन्यात मुंबईने चेन्नईचा पराभव केला आहे. तर चेन्नईनेही 12 सामन्यात विजय मिळवला आहे. यंदाच्या मोसमातील पहिला सामना मुंबई आणि चेन्नई संघात खेळण्यात आला होता. या सामन्यात चेन्नईने मुंबईचा पराभव केला होता.

मुंबई 12 गुणांसह पॉइंट्सटेबलमध्ये 3 ऱ्या क्रमांकावर आहे. तर चेन्नई 6 गुणांसह शेवटच्या म्हणजेच 8 व्या क्रमांकावर आहे. या सामन्यात मुंबईचा विजय मिळवून प्लेऑफ फेरीचा मार्ग सुकर करण्याचा प्रयत्न असेल. तर मुंबईवर मात करत प्लेऑफसाठी असलेली किंचितशी अपेक्षा कायम ठेवण्याचा मानस चेन्नईचा असेल.

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १३व्या हंगामाला चेन्नई सुपर किंग्जने गतविजेत्या मुंबई इंडियन्सला हरवूनच जोशात प्रारंभ केला होता, परंतु त्यानंतर चेन्नईच्या कामगिरीचा आलेख खालावतच गेला. शुक्रवारी मुंबईविरुद्धच्या परतीच्या लढतीत झगडणाऱ्या चेन्नईच्या संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. इम्रान ताहिरला संधी मिळण्याची शक्यता आहे. साखळीतील उर्वरित चारही सामने जिंकून गुणांची बेरीज १४ करीत बाद फेरीसाठी चेन्नईला आशावादी राहता येईल.

अबु धाबीच्या मैदानापेक्षा शारजाह इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियम वेगळं आहे. सीमारेषा छोट्या आहेत. वेगवान गोलंदाजांना मदत मिळण्याची शक्यता आहे. पण पीच संथ असल्यास फलंदाज फिरकीच्या जाळ्यात अडकू शकतात. आजच्या सामन्यात पावसाचा कोणताही व्यत्यय येणार नाही. पण खेळाडूंना उष्णतेचा सामना करावा लागेल. दव पडण्याची शक्यता आहे. नाणेफेक जिंकणारा संघ पहिल्यांदा फलंदाजी करु शकतो.

 

News English Summary: There is a different feel in the air whenever Mumbai Indians face Chennai Super Kings in the Indian Premier League. The two teams have shared an intense rivalry since the start of the tournament back in 2008, and it isn’t surprising that both CSK and MI have emerged as two most successful teams in the history of the tournament. While MI have won four titles under Rohit Sharma, MS Dhoni has led CSK to three IPL titles over the years.

News English Title: IPL 2020 Mumbai Indians Vs Chennai Super King LIVE cricket match updates.

हॅशटॅग्स

#IPL2020(28)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x