21 January 2025 12:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SIP Vs PPF Scheme | सर्वाधिक पैसा कुठे मिळेल, वार्षिक 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून कुठे अधिक परतावा मिळेल Wipro Share Price | आयटी शेअरमध्ये सुसाट तेजीचे संकेत, विप्रो शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: WIPRO IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, PSU स्टॉक फोकसमध्ये, तेजीचे संकेत - NSE: IREDA HFCL Share Price | एचएफसीएल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HFCL Quant Mutual Fund | पगारदारांसाठी मार्ग श्रीमंतीचा, फंडाची ही योजना 4 पटीने पैसा वाढवते, संधी सोडू नका Jio Finance Share Price | तेजीने कमाई होणार, जिओ फायनान्शियल शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करतोय, तेजी कायम राहणार का, ब्रोकरेज बुलिश - NSE: APOLLO
x

Cricket World Cup 2023 Semi Final | विश्वचषक सेमी फायनलमध्ये कोणत्या टीम पोहोचणार? धक्कादायक आकडेवारी समोर आली

Cricket World Cup 2023 Semi Final

ICC Cricket World Cup 2023 Semi Final | अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका सामन्यानंतर स्टार स्पोर्ट्सने वर्ल्ड कप 2023 मध्ये सहभागी असलेल्या सर्व 10 संघांची उपांत्य फेरीगाठण्याची शक्यता व्यक्त केली आहे. या यादीत भारतासह एकूण चार संघ आहेत, ज्यांची बाद फेरीगाठण्याची शक्यता ७५ टक्क्यांहून अधिक आहे, तर स्पर्धेत असे दोन संघ आहेत ज्यांना उपांत्य फेरीत पोहोचण्याची ९० टक्क्यांहून अधिक शक्यता आहे.

आतापर्यंत एकाही संघाला उपांत्य फेरीगाठता आलेली नाही किंवा कोणताही संघ स्पर्धेतून बाहेर पडलेला नाही. चला तर मग पाहूयात सर्व संघ उपांत्य फेरीत पोहोचण्याची शक्यता…

भारताची उपांत्य फेरीगाठण्याची शक्यता ९९.९ टक्के?
विश्वचषक २०२३ च्या उपांत्य फेरीत पोहोचण्याची भारताची शक्यता जवळपास १०० टक्के आहे. या स्पर्धेत विजय रथावर स्वार झालेल्या भारताने आतापर्यंत खेळलेल्या ६ पैकी ६ सामने जिंकले आहेत. पाच वेळा विजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवून स्पर्धेची सुरुवात केल्यानंतर भारताने अफगाणिस्तान, कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान, बांगलादेश, न्यूझीलंड आणि गतविजेत्या इंग्लंडला पराभूत केले. विश्वचषकात भारताचे श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्स विरुद्धचे आणखी तीन सामने शिल्लक आहेत. यापैकी कोणताही सामना जिंकून भारत उपांत्य फेरीचे तिकीट मिळवू शकतो.

भारत, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया टॉप-4 मध्ये
भारताव्यतिरिक्त दक्षिण आफ्रिका असा संघ आहे ज्याची उपांत्य फेरीगाठण्याची शक्यता ९० टक्क्यांहून अधिक आहे. आफ्रिकन संघाने आतापर्यंत ६ पैकी ५ सामने जिंकले असून त्यांची उपांत्य फेरीगाठण्याची शक्यता ९५.५ टक्के आहे. तर न्यूझीलंडची बाद फेरीगाठण्याची शक्यता ७५.३ टक्के आणि ऑस्ट्रेलियाची ७६.१ टक्के आहे.

अफगाणिस्तानने खळबळ उडवून दिली आहे
विश्वचषक २०२३ मध्ये तीन सामने जिंकून अफगाणिस्तानने गुणतालिकेसह उपांत्य फेरीच्या शर्यतीत उत्साह वाढवला आहे. अफगाणिस्तान संघाने प्रथम गतविजेत्या इंग्लंडला पराभूत केले, त्यानंतर त्यांनी पाकिस्तान आणि श्रीलंकेला पराभूत केले. ही स्पर्धा त्यांच्यासाठी आतापर्यंत शानदार राहिली आहे. त्यामुळेच श्रीलंका, पाकिस्तान आणि इंग्लंड सारख्या बड्या संघांपेक्षा त्यांची उपांत्य फेरीगाठण्याची शक्यता जास्त आहे. श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर अफगाणिस्तानची उपांत्य फेरीगाठण्याची शक्यता ३३.१ टक्क्यांवर पोहोचली आहे.

पाकिस्तान खूपच पिछाडीवर
बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाने विश्वचषक २०२३ मधील पहिले दोन सामने जिंकून स्पर्धेची शानदार सुरुवात केली, पण भारताविरुद्ध पहिला पराभव पत्करावा लागल्यानंतर संघाची गाडी रुळावरून घसरली आहे. भारताविरुद्धच्या सामन्यानंतर पुढील तीन सामन्यांतही पाकिस्तानचा पराभव झाला आहे. यामुळेच संघ ६ सामन्यांत ४ गुणांसह अफगाणिस्तान आणि श्रीलंकेच्या खाली सातव्या स्थानावर आहे. त्यामुळे त्यांची उपांत्य फेरीगाठण्याची शक्यता ६.६ टक्क्यांवर आली आहे.

विश्वचषक २०२३ मध्ये सहभागी होणाऱ्या सर्व संघांना उपांत्य फेरीगाठण्याची संधी आहे
* भारत – 99.9%
* दक्षिण आफ्रिका – 95.5%
* न्यूझीलंड – 75.3%
* ऑस्ट्रेलिया – 76.1%
* अफगाणिस्तान – ३३.१%
* श्रीलंका – 6.7%
* पाकिस्तान – 6.6%
* नेदरलँड्स – 5.9%
* बांगलादेश – 0.4%
* इंग्लंड – 0.4%

News Title : Cricket World Cup 2023 Semi Final 31 October 2023.

हॅशटॅग्स

#Cricket World Cup 2023 Semi Final(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x