14 November 2019 1:11 PM
अँप डाउनलोड

वर्ल्ड बॉक्सिंग स्पर्धाः अमित पंघल फायनलमध्ये

World Boxing Championship, Boxer Amit Panghal

भारतीय बॉक्सर अमित पांघलने जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अशी कामगिरी करणारा अमित पहिला पुरुष बॉक्सर ठरला आहे. २०१८ साली झालेल्या आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या अमितने ५२ किलो वजनी गटात उपांत्य फेरीत कझाकस्तानच्या साकेन बिबॉसिनोव्हचा पराभव केला. दुसरीकडे ६३ किलो वजनी गटात भारताच्या मनिष कौशिकला मात्र उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला.

अमित पंघलने कॉमनवेल्थ गेम्समध्ये सिल्वर पदक मिळवले होते. पंघलने कझाकच्या बॉक्सरचा पराभव केला. अमित पंघलने फायनलमध्ये धडक मारली असून फायनलमध्ये अमितचा सामना उझ्बेकिस्तानच्या शाखोबद्दीन जोइरोव सोबत होणार आहे. जोइरोव हा ऑलिम्पिक चॅम्पियन आहे. जोइरोवने फ्रान्सच्या बिलाल बेनामाचा ५-० असा पराभव करीत फायनलमध्ये धडक मारली आहे.

अमितने २०१८ च्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. २०१८च्या राष्ट्रकुल स्पर्धेत त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. याशिवाय आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत त्याने २०१७ मध्ये कांस्य आणि २०१९ मध्ये सुवर्णपदक जिंकले.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1036)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या