28 April 2024 10:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट
x

माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते स्वामी चिन्मयानंद यांना बलात्काराच्या आरोपात अटक

Rape, BJP leaders, Rape BJP Corporator, Rape BJP MLA

शाहजहांपूर: माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते स्वामी चिन्मयानंद यांना अटक करण्यात आली आहे. महाविद्यालयीन तरुणीने केलेल्या बलात्काराच्या आरोपांनंतर उत्तर प्रदेश पोलीस आणि विशेष तपास पथकाने कारवाई करत त्यांना अटक केली आहे. शहाजहांपूर येथील आश्रमातून विशेष तपास पथकानं आज सकाळी चिन्मयानंद यांना अटक केली असून त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात येणार आहे. त्यानंतर चिन्मयानंद यांना न्यायालयात हजर केलं जाईल. जिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात असून एसआयटीचं पथक देखील रुग्णालयात आहे.

चिन्मयानंद यांच्यावर छळाचे आरोप करून बेपत्ता झालेल्या एका २३ वर्षीय तरुणीसोबत ही व्यक्ती राजस्थानात सापडली होती.विधि महाविद्यालयाची विद्यार्थिनी असणाºया या तरुणीने सोशल मीडियात एक व्हिडिओ पोस्ट करून भाजपच्या या नेत्यावर असा आरोप केला होता की, त्यांनी अनेक मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे.

दरम्यान, प्रकृती बिघडल्याचं कारण चिन्मयानंद यांना बुधवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यानंतर गुरुवारी त्यांना लखनौमधील केजीएमयूमध्ये दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र आयुर्वेदिक उपचार व्हावेत अशी चिन्मयानंद यांची मागणी होती. त्यामुळे त्यांना पुन्हा मुमुक्षू आश्रमात परत नेण्यात आलं.

हॅशटॅग्स

BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x