20 May 2024 8:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांनो! FD व्याजाचे नवे दर समजून घ्या, अन्यथा नुकसान, सर्व ग्राहकांना लाभ नाही Numerology Horoscope | 20 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 20 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं
x

राज्यातील सर्व प्रश्न संपले; भाजपसारखा आत्मविश्वास कोणाकडेच नाही: उद्धव ठाकरेंचा टोला

Udhav Thackeray, Uddhav Thackeray, Shivsena, Amit Shah, Maharashtra Assembly Election 2019, Maharashtra Vidhansabha Election 2019

मुंबई: ‘राज्यात पूर्ण बहुमतानं भाजपचंच सरकार येणार, हे भाजपाध्यक्ष अमित शहा यांचं वक्तव्य शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना चांगलंच खटकलं आहे. शहांच्या या वक्तव्याचा उद्धव यांनी अप्रत्यक्षपणे समाचार घेतला आहे. ‘महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका ही केवळ औपचारिकताच उरली आहे. लोकांनी फक्त बटण दाबायचे आहे, दुसरे काय?,’ असं उद्धव यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, शिवसेनेचा ५०-५०चा फॉर्म्युला हा भाजपला अद्याप अमान्यच आहे. त्यामुळे जागावाटपाचा तिढा हा अद्याप कायम आहे. युती होणार हे १०० टक्के नक्की असलं तरी जागावाटपाबाबत अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना १२६ जागांवर ठाम आहे तर भाजप १२० पैकी एकही जागा देण्यासाठी तयार नाही आहे. त्यामुळे शिवसेनेला कमी जागांवर समाधान मानावं लागणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

लोकसभेमध्ये युतीसाठी ५०-५० फॉर्म्युला वापरण्यात आला होता तोच विधानसभेवेळीही वापरण्यात येणार असल्याची चर्चा होती. पण विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि सेनेमध्ये जोरदार इनकमिंग झालं. त्यामुळे दोन्ही पक्षांचं पारडं जड आहे. असं असताना ५०-५०च्या फॉर्म्युल्याने दोन्ही पक्षांना अडचणी येतील. तर मोठा पक्ष म्हणून भाजप १२० जागेच्या वर एकही जागा शिवसेनेला देण्यासाठी तयार नसल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

उद्धव यांनी ‘सामना’च्या आजच्या अग्रलेखातून या मुद्द्यावर तिरकस भाष्य केलं आहे. महाराष्ट्राची निवडणूक राष्ट्रीय मुद्द्यांवर लढण्याच्या भाजपच्या रणनीतीवरही त्यांनी टीका केली आहे. ‘राष्ट्रीय प्रश्नांची एक नशा असते. त्यापुढं इतर विषय गौण ठरतात. राज्यांच्या प्रश्नांवर नंतर केव्हाही बोलता येईल, असं सध्याचं वातावरण आहे. महाराष्ट्रात आता कोणतेच प्रश्न शिल्लक नाहीत, असं भाजप नेत्यांचं म्हणणं आहे. असा आत्मविश्वास याआधी कोणत्याही पक्षानं दाखवला नव्हता. भाजपकडं हा आत्मविश्वास आहे, त्याचा आम्हाला आनंदच आहे,’ असा टोला उद्धव यांनी लगावलाय.

हॅशटॅग्स

#Amit Shah(265)#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x