सोलापूर: राज्यात सत्ता आल्यावर अवघ्या दहा रुपयांमध्ये भरपेट जेवण देऊ, अशी घोषणा करणाऱ्या शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी टोला लगावला आहे. तुम्हाला राज्य चालवायला दिलंय की स्वयंपाक करायला, असा खोचक सवाल त्यांनी विचारला. ते शनिवारी बार्शी येथील प्रचारसभेत बोलत होते.
यावेळी त्यांनी शिवसेना-भारतीय जनता पक्षावर टीकेची झोड उठवली. विशेषत: त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या दहा रुपयांमध्ये सकस थाळी देण्याच्या घोषणेचा समाचार घेतला. यापूर्वी शिवसेनेकडून राज्यात एक रुपयात झुणका भाकर अशी योजना सुरु करण्यात आली होती. मात्र, पुढे त्याच काय झालं? झुणका भाकर केंद्रे बंद पडली आहेत. या केंद्रांची जागा हडपण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच आम्ही तुम्हाला राज्य चालवायला दिलंय की स्वयंपाक करायला, असा खोचक सवालही त्यांनी विचारला.
आता एकायला येतंय की १० रुपयांत जेवणाची थाळी मिळेल. राज्यात कुठे आणि किती ठिकाणी ही थाळी देणार. तुम्हाला राज्य करायला सांगतोय की स्वयंपाक करायला सांगतोय हाच प्रश्न पडलाय. अन्नधान्याचा प्रश्न आहेच, पण त्यासोबतच राज्यात इतर देखील प्रश्न आहेत. pic.twitter.com/r9fbTICfyh
— Sharad Pawar (@PawarSpeaks) October 12, 2019
उद्धव ठाकरेंनी शिवाजी पार्कवरील आपल्या घोषणेप्रमाणे शिवसेनेच्या वचननाम्यात १० रुपयात सकस जेवणाची थाळी देण्याच आश्वासन दिलंय. शरद पवार यांनी बार्शी येथील उमेदवार निरंजन भूमकर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभा घेतली. या सभेत बोलताना, शिवसेनेच्या १० रुपयात थाळी देण्याच्या योजनेचा समाचार घेतला. यापूर्वी शिवसेनेकडून १ रुपयात झुणका भाकर सुरू करण्यात आली होती. काय झालं त्याचं? झुणका भाकर केंद्र बंद पडली. मात्र, तेथील जागा हडपण्यात आल्या आहेत. त्या जागेवर इतर उद्योगधंदे सुरू असल्याचं पवार यांनी म्हटलं. तसेच, आम्ही तुम्हाला राज्य चालवायला दिलंय की स्वयंपाक करायला, असे म्हणत १० रुपयातील थाळीवरुन शिवसेनेला टोला लगावला. दरम्यान, यापूर्वी अजित पवार यांनीही १० रुपयांच्या थाळीवरुन शिवसेनेला टोला लगावला आहे.
