8 May 2024 2:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 08 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Jindal Stainless Share Price | मल्टिबॅगर 307% परतावा देणारा स्टॉक 'खरेदी' करण्याचा सल्ला, अल्पावधीत 30% परतावा मिळेल BHEL Share Price | PSU BHEL स्टॉकवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून मालामाल करणारी मजबूत टार्गेट प्राईस जाहीर Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकचार्ट काय संकेत देतोय? या प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांचा इशारा काय? Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची मजबूत परतावा देणारी योजना, बचतीवर रु.56,830 फक्त व्याज मिळेल SBI Mutual Fund | नोट छापायची मशीन आहे ही SBI म्युच्युअल फंड योजना, 5,000 च्या SIP वर 1.37 कोटी रुपये परतावा Waaree Renewables Share Price | 2 रुपयाच्या शेअरची कमाल! 4 वर्षात दिला 137000% परतावा, खरेदी करणार?
x

युपीच्या शिवसैनिकाकडून कमलेश तिवारींची हत्या करणाऱ्याचा गळा चिरण्यासाठी १ कोटींचं बक्षीस

kamlesh Tiwari, HIndu Group, Shivsena, BJP, Arun pathak

उत्तर प्रदेश: हिंदू समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमलेश तिवारी यांची निर्घृणपणे गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. त्यानंतर शिवसेना नेते अरुण पाठक यानं सोशल मीडियावर एक व्हिडीओ जारी केला. या व्हिडीओच्या माध्यमातून अरुण पाठक यानं कमलेश यांच्या मारेकऱ्यांचा गळा चिरणाऱ्याला एक कोटींचं बक्षीस जाहीर केलं आहे. व्हिडीओत तो म्हणतो, मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. मी उत्तर प्रदेशमधल्या लखनऊमध्ये झालेल्या माझ्या भावाच्या हत्येचा निषेध नोंदवतो. त्या मारेकऱ्यांचं मुंडकं उडवणाऱ्यांना एक कोटी रुपयांचं बक्षीस देणार आहे. त्यासाठी माझी सर्व संपत्तीही विकून टाकेन. कमलेश तिवारींची निर्दयी हत्या करणाऱ्यांचा पोलीस तपास करत आहेत, जोपर्यंत त्यांना पोलीस पकडत नाही, तोपर्यंत मला चैन पडणार नाही. जेव्हा त्यांचा गळा चिरला जाईल, तेव्हाच मला समाधान मिळेल, असंही अरुण पाठक म्हणाला.

कमलेश तिवारी हत्याकांडात उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी बिजनोरमधून मौलाना अनवारुल हकला अटक केली आहे. तर दुसरीकडे गुजरात एटीएसनं या प्रकरणात सूरतमधून सहा संशयितांना ताब्यात घेतलं. कमलेश तिवारी हत्या प्रकरणात बिजनोरच्या दोन मौलानांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्यावर हत्येचा कट रचण्याचा आरोप ठेवण्यात आलाय. मौलाना मुफ्ती नईम काजमी, इमाम मौलाना अनवारुल हक यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला असून, २०१५मध्ये या दोन्ही मौलानांनी कमलेशला ठार करणाऱ्याला १.५ कोटींचं बक्षीस देणार असल्याचं सांगितलं होतं. कमलेश तिवारी यांची पत्नी किरन यांनी नाका हिंडोला पोलीस स्टेशनमध्ये या दोघांविरोधात एफआयआर नोंदवला आहे.

दरम्यान, एनडीटीव्ही’ने दिलेल्या वृत्तानुसार हिंदु समाज पक्षाचे नेते कमलेश तिवारी यांच्या हत्येप्रकरणी आता एक नवीन ट्विस्ट समोर आले आहे. कमलेश तिवारी यांच्या कुटुंबीयांनी भाजप नेत्यावर कट रचण्याचा आरोप केल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे. राम जानकी मंदिर प्रकरणामुळे आपल्या मुलाला लक्ष्य करण्यात आले आहे असा खळबळजनक आरोप कमलेश तिवारीच्या आईने केला आहे. स्थानिक नेते शिवकुमार गुप्ता यांचे नाव घेत त्या म्हणाल्या की, ते माफिया असल्याने माझ्या मुलाच त्यांच्यासमोर काहीच चालू शकलं नाही. तत्पूर्वी, कमलेश तिवारी यांच्या मुलानेही एनआयएला घटनेची चौकशी करण्याचे आवाहन केले आणि सांगितले की आम्हाला प्रशासनावर विश्वास अजिबात नाही.

कमलेश तिवारी यांचा मुलगा सत्यम तिवारी यांनी सांगितलं की, ‘ज्या लोकांना या हत्येप्रकरणी अटक झाली आहे त्यांनीच मारले आहे की मारणारे लोक दुसरेच कोणी आहेत. तसेच, जर ही माणसे खरी गुन्हेगार असतील आणि त्यांच्याविरूद्ध काही व्हिडिओ पुरावे असतील तर त्याची चौकशी एनआयएने करायला हवी. सत्यम तिवारी पुढे म्हणाले की, जर त्यांच्या तपासणीत हे सिद्ध झाले तरच आमचं कुटुंब समाधानी असेल, अन्यथा आम्हाला या प्रशासनावर विश्वास नाही’ असं त्यांनी ठणकावून सांगितलं.

त्याचवेळी कमलेश तिवारी यांच्या आईच्या संशयावरून उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी देखील योगी सरकारवर निशाणा साधला. एका मोर्चाच्या वेळी ते म्हणाले की समाजवादी पक्षाच्या सरकारच्या काळात हिंदू पक्षाच्या नेत्याला मारण्यात आले होते, त्यांना सुरक्षा देण्यात आली होती पण योगी सरकारने सुरक्षा पुरविली नाही. त्याच्या आईने बर्‍याच वेळा याचा उल्लेख केला आहे हे अधोरेखित करायला हवं असं ते म्हणाले.

अखिल भारतीय हिंदू महासभेचे अध्यक्ष म्हणून स्वत:चे वर्णन करणारे कमलेश तिवारी यांची शुक्रवारी घरात हत्या करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही घटना रेकॉर्ड झाल्याने तिन्ही संशयितांना स्पष्टपणे पाहिले जाऊ शकते. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार सकाळी दोन जण कमलेश तिवारी यांना भेटायला आले होते. ज्यांना तिवारी यांनी आत बोलावले. त्यानंतर त्याच्या जोडीदाराला सिगारेट आणण्यास सांगितले. त्यानंतर कमलेश तिवारी यांची हत्या करण्यात आली या समजतं. घटनास्थळावरून एक पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. दिवाळीनिमित्त मिठाई देण्याच्या बहाण्याने हे लोक आत आले, पण त्यांच्या डब्यात शस्त्रे होती.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x