4 August 2020 1:22 PM
अँप डाउनलोड

नव्याने दाखल झालेले भाऊ निवडणुकीसाठी मला खलनायक सिद्ध करण्याच्या प्रयत्नात: धनंजय मुंडे

Maharashtra Vidhansabha Election 2019, NCP Leader Dhananjay Munde, Pankaja Munde, Mahadev jankar

परळी: ग्रामविकास मंत्री आणि आपली बहीण पंकजा मुंडे यांच्या विरोधात आपण आक्षेपार्ह विधान केले हे सिद्ध केल्यास मी माझे जीवनच संपवून टाकीन, असे म्हणत आमच्या बहीण-भावाच्या नात्यात कुणीतरी विष कालवण्याचा प्रयत्न करत असल्याचा उलट आरोप धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेत केला. राखी बांधणाऱ्या बहिणीबाबत मी कधीही खालच्या थराला येऊन असले विधान करणार नाही, मात्र नव्याने दाखल झालेले भाऊ मला खलनायक असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न करून माझे समाजातील अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचेही मुंडे म्हणाले. या मागे जो कुणी असेल त्याला शोधून काढण्यासाठी आता आपण या प्रकरणाच्या खोलात जाणार असल्याचेही ते म्हणाले. या वेळी पत्रकार परिषदेत बोलताना धनंजय मुंडे यांना अश्रू अनावर झाले.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले,”मी १७ तारखेला बोललो, ती क्लिप १९ तारखेला व्हारयल झाली. माझी भाषण लाईव्ह दाखवण्यात आली. जर मी चुकीचं बोललो असतो, तर लगेच माझ्यावर टीका झाली असती. ती क्लिप फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवून चौकशी करावी. त्यात एका शब्दाची चूक दिसली तर फाशी जाईल. हे विष कालवण्याऐवजी एक शब्द टाकला असता, तर मी लगेच माघार घेतली असती. एका व्यक्तीला संपवण्यासाठी किती डोकी, किती लोक कामाला लागलं हे लगेच लक्षात येतं. इतक्या खालच्या पातळीला राजकारण जाणार असेल, तर तसं करणं मला शक्य नाही. माझे आणि पंकजा मुंडे यांची भाषणं ऐका. त्या मला चोर म्हणाल्या, दुष्ट राक्षस म्हणाल्या. पण मी काही बोललो नाही. माझ्यावर संस्कार आहेत. माझ्या जागी कुणीही असता तर वेगळी प्रतिक्रिया दिली असती. मात्र, मी तस करणार नाही. मला खलनायक करण्याचा प्रयत्न होत आहे. आमच्या नात्यात विष कालवणाऱ्यांनी लक्षात घ्यावं की, त्यांनाही नाती आहेत. मलाही बहिणी आहेत. पण, या आरोपांमुळं जगाव की, मरावं अशी स्थिती झाली आहे,” असं धनंजय मुंडे यांनी सांगितलं.

शनिवारी माझ्या वक्तव्याबद्दल सोशल मीडियावर व्हायरल झालेली ती क्लिप एडिट करून, वक्तव्याचा विपर्यास करणारी आणि जाणीवपूर्वक माझी बदनामी करणारी आहे. ती क्लिप पूर्णपणे चुकीची असून त्याची सत्यता फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासावी, असे स्पष्टीकरण धनंजय मुंडेंनी दिलंय. अशी क्लिप एडिट करणाऱ्यांनी किमान बहिण-भावाच्या पवित्र नात्याचा तरी आदर ठेवावा, आपली निवडणूक विकास कार्यावर आहे, ती भावनिकतेवर घेऊन जाताना इतकी खालची पातळी गाठू नका ही कळकळीची विनंती आहे, असे भावनिक आवाहनही मुंडेंनी केलंय.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Dhananjay Mundey(32)#Pankaja Munde(38)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x