10 May 2025 4:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 11 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Power Share Price | खुशखबर! मल्टिबॅगर पेनी स्टॉक फोकसमध्ये, जोरदार तेजीचे संकेत - NSE: RPOWER NBCC Share Price | 28 टक्के कमाईची संधी मिळतेय, मल्टिबॅगर PSU शेअरची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NBCC NTPC Green Energy Share Price | 52% रिटर्न मिळेल, स्वस्त शेअरवर ब्रोकिंग फर्म बुलिश, फायदा घ्या - NSE: NTPCGREEN JP Power Share Price | पेनी स्टॉक मालामाल करणार; जेपी पॉवर शेअर फोकसमध्ये, टार्गेट नोट करा - NSE: JPPOWER HUDCO Share Price | तब्बल 72 टक्के परतावा मिळेल; PSU शेअर खरेदी करा, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO BHEL Share Price | मल्टिबॅगर पीएसयू शेअर मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
x

कॉंग्रेस नेते डीके शिवकुमार यांना जामीन मंजूर

karnataka DK shivakumar, money laundering case

नवी दिल्ली: लाँडरिंग प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने कॉंग्रेस नेते डीके शिवकुमार यांना जामीन मंजूर केला आहे. २५ लाखांच्या वैयक्तिक बाँडवर जामीन मंजूर झाला आहे. यासह कोर्टाने त्यांना देशाबाहेर जाऊ नका असे निर्देश दिले आहेत. कोर्टाने असेही म्हटले आहे की ते पुराव्यांशी छेडछाड करणार नाहीत आणि साक्षीदारांवर प्रभाव पाडणार नाहीत याची काळजी घ्यावी.

कोर्टाने पुढे म्हटले आहे की जेव्हा कधी चौकशीची गरज लागेल तेव्हा संबंधित यंत्रणेला सहकार्य करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. मनी लॉन्ड्रींग प्रकरणात डीके शिवकुमार यांना ईडीने ३ सप्टेंबर रोजी अटक केली होती.

आज सकाळी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कर्नाटकचे माजी मंत्री डीके शिवकुमार यांची भेट घेतली आणि त्यांना पाठिंबा दर्शवला होता. कॉंग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी सकाळी तिहार जेलमध्ये पोहोचल्या. कर्नाटकातील या ज्येष्ठ नेत्याच्या पाठीशी पक्ष ठामपणे उभा असल्याचं त्या म्हणाल्या. तिहार तुरुंगात पोहोचल्यानंतर सोनिया यांनी आयएनएक्स मीडिया प्रकरणात अटक केलेले ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचीही भेट घेतली.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या