4 May 2024 4:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर BHEL Share Price | भरवशाचा PSU शेअर! अल्पावधित दिला 258% परतावा, कंपनीबाबत अजून एक सकारात्मक अपडेट Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीचा मोठा निर्णय, 1 वर्षात 414% परतावा देणारा स्टॉक कोसळणार की तेजीत येणार? Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर पुढे किती फायद्याचा ठरणार? तेजीत येणार? Buy करावा की Sell?
x

गुडविन ज्वेलर्सचा मालक फरार; ग्राहकांना करोडोचा गंडा

Goodwin Jewelers, Scam, Dombivali, Thane

ठाणे: ऐन दिवाळीत गुडविन ज्वेलर्स दुकानाला टाळे लागल्याने ग्राहकांचे धाबे दणाणले असून आत्तापर्यंत या ज्वेलर्स विरोधातील तक्रारींचा आकडा वाढत ५० च्या पुढे गेला आहे. फसवणुकीची रक्कम जवळपास तीन कोटी रुपयांच्या आसपास असून यामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

डोंबिवलीतलं गुडविन ज्वेलर्स..अनेक शहरांमध्ये त्यांच्या शाखा आहेत. २१ ऑक्टोबरला दुकान दोन दिवस बंद राहील, अशी पाटी दुकानाबाहेर लावण्यात आली होती. मात्र आता ७ दिवसांनंतरही दुकान उघडलेलं नाही. त्यामुळे ग्राहकांना धक्का बसला मोठा आहे. गुडविन ज्वेलर्समध्ये भिशी, फिक्स डिपॉझिट, रिकरिंग डिपॉझीट्स यामध्ये लाखो रुपयांची गुंतवणूक करण्यात आल्यामुळे शेकडो ग्राहकांच्या तोंडचं पाणी पळालंय.

सोमवारी शेकडो गुंतवणूकदारांनी दुकानाबाहेर गर्दी केली. यापूर्वीही डोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्स अशाचप्रकारे बंद करण्यात आलं होतं. त्यातही कोट्यवधी रुपये अडकले होते. सध्या पीएमसी घोटाळा गाजत असून त्यानंतर आता गुडविन ज्वेलर्सकडूनही अशीच फसवणूक होते का? अशा विवंचनेत गुंतवणूकदार सापडले आहेत. गुंतवणूकदारांनी रामनगर पोलीस ठाण्यात धाव घेत फसवणूक झाल्याबाबत तक्रार दाखल केली आहे. त्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करीत दुकानाला सील लावला असून, तपास सुरू केला आहे.

गुडविन ज्वेलर्सचे मालक आणि मॅनेजरविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या शोधासाठी घरी पोलीस पाठवण्यात आले. मात्र ते घर रिकामं करून गायब झाल्याचं समोर आलं आहे. या तक्रारींनुसार फसवणुकीचा आकडा एक कोटी १३ लाख असून एकूण फसवणुकीचा आकडा दोन कोटी ९३ लाखावर गेला आहे. वास्तविक जास्त परतावा देण्याचं आमिष दाखवून फसवणुकीचे प्रकार वारंवार घडतात, पण लोकांचे डोळे उघडत नाहीत.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x