3 May 2025 6:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

निषेधार्ह! उपचारांसाठी इस्पितळात दाखल झालेल्या राऊतांवर भाजप समर्थकांच्या विकृत प्रतिक्रिया

MP Sanjay Raut, Social Media, Shivsena, BJP Supporters

मुंबई: राजकारणात सध्या कोणत्या थराला जाऊन पोहोचले आहे याचा प्रत्यय पुन्हा आला आहे. राजकारणात एखाद्याशी वैचारिक मतभेद असणं यात काहीच वावगं नाही आणि आपलं मत वैचारिक पातळीवर व्यक्त करणं यात देखील काहीच चुकीचं नाही. मात्र एखाद्या व्यक्तीचा राजकीय स्तरावरील विचार किंवा भूमिका आपल्याला पटत नाही म्हणून संबंधित व्यक्तीला कोणत्या थरावर आणि कोणत्या क्षणी लक्ष करावं याला देखील मर्यादा असाव्यात.

तसाच काहीसा प्रकार शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या बाबतीत घडताना दिसत आहे, जो पूर्णपणे निषधार्ह आहे. काल प्रकृती अस्वस्थतेमुळे अचानक इस्पितळात दाखल झालेल्या संजय राऊतांवर भाजप समर्थक खालच्या थराला जाऊन टीका करत आहेत. एखाद्याला कोणत्या क्षणी लक्ष करावं याला देखील मर्यादा राहिलेली नाही. म्हणजे इस्पितळात आपला शत्रू जरी दाखल झाला तरी त्याच्या प्रकृतीत सुधारणा होउ दे अशी प्रार्थना करणारी आपली संस्कृती आहे. प्रत्येक गोष्ट राजकीय चष्म्यातून पाहणं म्हणजे निव्वळ वेड्यांचा बाजार म्हणावा लागेल. राऊतांचं संपूर्ण कुटूंब त्यांच्यासोबत असताना भाजप समर्थक मात्र त्यांना त्या परिस्थितीत देखील शिव्या-श्राप देत आहेत जे वेदनादायी आणि निषेधार्ह आहे.

मागील काही दिवसांपासून शिवसेनेची भूमिका ठाम पणे मांडत भाजपशी दोन हात करणारे संजय राऊत भाजप समर्थकांच्या पचनी पडलेले दिसत नाहीत. राजकारण ज्यांना समजत नाही, त्यांनाच हे वाटू शकतं की संजय राऊत सर्व भूमिका या शिवसेना नैतृत्वाला विश्वासात न घेता मांडत आहेत. वास्तविक खंबीर भूमिका मांडावी अशीच पक्ष नैतृत्वाची इच्छा असल्याने ते त्यांचं कर्तव्य मागील काही दिवसांपासून योग्य रीतीने बजावत आहेत. विशेष म्हणेज आज देखील त्यांनी मोठ्या उम्मेदीने ट्विट करत शिवसेनेचा आत्मविश्वास वाढवला आहे.

कालच्या बातमीनुसार शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात येते आहे. संजय राऊत यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये दोन ब्लॉकेजेस आहेत. त्यामुळे अँजिओग्राफी करण्यात आल्यानंतर आता त्यांच्यावर लिलावती रुग्णालयात अँजिओप्लास्टी करण्यात येते आहे. काल दुपारच्या सुमारासच त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मागील २ दिवसांपासून त्यांच्या छातीत दुखत होतं मात्र संजय राऊत यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. आज त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर शिवसेना खासदार यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आली.

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये दोन ब्लॉकेजेस आढळले. दुपारनंतर त्यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आली. त्यानंतर अँजिओप्लास्टी करण्यात आली. मागील १५ ते १८ दिवसांपासून ते शिवसेनेची भूमिका सातत्याने माध्यमांसमोर मांडत आहेत. अत्यंत आक्रमकपणे संजय राऊत ही शिवसेनेची भूमिका मांडत आहेत. शिवसेनेचाच मुख्यमंत्री व्हावा ही भूमिका त्यांनी सातत्याने माध्यमांसमोर मांडली. तसंच शरद पवार यांच्या भेटीगाठीही घेतल्या होत्या.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या