मुंबई: लिलावती रुग्णालयात उपचार घेत असलेले शिवसेनेचे संजय राऊत यांच्या भेटीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रुग्णालयात दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरे भेटीला येण्यापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे संजय राऊत यांची भेट घेऊन गेले आहेत. भाजपाला दूर केल्यानंतर संजय राऊत यांनी शिवसेनेची भूमिका आक्रमकपणे मांडणाऱ्या राऊत यांनी बहुमतासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा पाठिंबा मिळवण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या नव्या आघाडीतील संजय राऊत महत्वाचा दुवा असून, रुग्णालयात असतानाही ते सध्या सक्रिय असल्याचे दिसत आहे.

संजय राऊत यांच्यावर लिलावती रुग्णालयात सोमवारी यशस्वी शस्त्रक्रीया पार पडली. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीची माहिती मनोहर जोशी यांनी दिली आहे. तब्येतीची वेळीच योग्य ती काळजी घेतली नाही तर आणखीन बिघडण्याची शक्यता आहे. असं ते म्हणाले दोन दिवसांमध्ये राऊत यांना डिश्चार्ज मिळण्याची शक्यता असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी आज पक्षाच्या बैठकीआधी लिलावती रुग्णालयात जाऊन संजय राऊत यांची भेट घेतील. जवळपास १५ मिनिटांची ही भेट होती. यावेळी शरद पवार यांच्यासोबत आमदार रोहित पवारही उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलार यांनीही आज संजय राऊत यांची रुग्णालयात भेट घेऊन विचारपूस केली. या भेटीचे फोटोही समोर आले आहेत. आशिष शेलार हे वांद्रे पश्चिम मतदारसंघाचे आमदार आहेत. याशिवाय शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील हे देखील संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी लिलावतीमध्ये पोहोचले.

याचबरोबर, राज्यातील सत्तास्थापनेचा पेच गुंतागुंतीचा बनलेला असताना या सर्व घडामोडीत शिवसेनेची ढाल बनून लढणारे संजय राऊत यांनी लीलावती रुग्णालयात ट्विट करुन पुन्हा एकदा सत्तास्थापनेच्या प्रयत्नात शिवसेना मागे हटली नाही, असा विश्वास निर्माण केला आहे. “लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशीश करने वालों की कभी हार नही होती।’ हम होंगे कामयाब, जरूर होंगे अशा शब्दात संजय राऊतांनी रुग्णालयातून शिवसेनेचा आत्मविश्वास कायम ठेवला आहे.

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून संजय राऊत यांच्या आरोग्याची विचारपूस