29 April 2024 12:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

गिरगावात मेट्रो-३ विरोधात शिवसेनेचं आक्रमक आंदोलन

Mumbai Metro 3, Shivsena Protest at Girgaon

मुंबई: शिवसेनेनं मेट्रो 3 प्रकल्पा विरोधात पुन्हा एकदा तीव्र आंदोलन सुरू केलं आज गिरगावातील मेट्रो तीन प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या खोदकामांमुळे स्थानिक नागरिकांना जो त्रास होतेय त्या संदर्भात शिवसेना आंदोलन करत आहे. शाळेत जाणार्या विद्यार्थ्यांना दररोजचा त्रास तसेच रहिवाशांना त्यांच्याच घरी येण्याजाण्यासाठी करावी लागणारी कसरत. या संदर्भात शिवसेनेनं हे आंदोलन सुरू केलं. या आंदोलनादरम्यान गिरगावात मेट्रो ३ प्रकल्पासाठी सामानांची ने आण करणारे डंपर शिवसैनिकांनी फोडले. डंपरच्या काचा तोडण्यात आल्यात. तसेच डंपरमधील ड्रायव्हर आणि क्लिनर यांना शिवसैनिकांनी पळवून लावलं.

शिवसेना नेते पांडुरंग सकपाळ यांनी यासंबंधी बोलताना सांगितलं आहे की, ‘मेट्रोच्या कामामुळे गेल्या एक वर्षापासून लोकांना त्रास होत आहे. आम्ही डम्पर हटवा अशी मागणी केली होती. दक्षिण मुंबईत अवजड वाहनांना बंदी असतानाही डम्पर सुरु असतात. याचा नागरिकांना त्रास होत असून शाळकरी विद्यार्थ्यांनाही त्रास सहन करावा लागतो. सर्वांना विनंती करुनही काही मदत होत नाही. जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरु राहणार आहे”.

या आंदोलनाने हिंसक वळण घेत आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत गाड्यांचं मोठं नुकसान झालं आहे. सकाळीच शिवसेनेचे कार्यकर्ते मेट्रो ३ च्या बाहेर आंदोलन करत होते. त्यानंतर तिथे उभे असलेल्या डी.बी. रिअ‍ॅलिटी डेव्हलपर्सच्या गाड्या फोडल्या. घटनास्थळ पोलीस दाखल झाले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. आंदोलकांनी हातात फलक घेऊन वाहतूक पोलिसांना वाहतुकीच्या वर्दळीमुळे शाळेत विद्यार्थ्यांना होणारा उशीर तसेच अन्य समस्या निदर्शनास आणून दिल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेट्ससाठी आम्हाला ट्विटरवर फॉलो करा

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x