मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या (Chief Minister Uddhav Thackeray) नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचा विश्वासदर्शक ठराव आज, शनिवारी विधानसभेत मांडला जाणार असून, त्यासाठी शनिवार आणि रविवार असे २ दिवसांचे विधानसभा अधिवेशन बोलाविण्यात आले आहे. शनिवारी दुपारी दोन वाजता सत्ताधारी आघाडीतर्फे विश्वासदर्शक ठराव आणला जाईल.
Leaders of Maha Vikas Aghadi to meet at Vidhan Bhavan at 9.30 am today over confidence vote and Speaker election https://t.co/Z0By1cAKSj
— ANI (@ANI) November 30, 2019
भारतीय जनता पक्षाकडून कोणतीही गडबड केली जाऊ नये म्हणून विधानसभेचे हंगामी अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार कालिदास कोळंबकर (BJP MLA Kalidas Kolambkar) यांच्याऐवजी एनसीपी’चे दिलीप वळसे-पाटील यांची शुक्रवारी नियुक्ती करण्यात आली. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारला ३ डिसेंबपर्यंत विश्वासदर्शक ठराव मंजूर करण्याची मुदत दिली होती. त्यानुसार आजपासून सुरू होणाऱ्या दोन दिवसांच्या विशेष अधिवेशनात विश्वासदर्शक ठराव मंजूर केला जाईल. हंगामी अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कामकाजात विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानाने मंजूर करण्याची सत्ताधाऱ्यांची योजना आहे. शिवसेना, काँग्रेस, एनसीपी’, अपक्ष आणि छोट्या पक्षांसह आघाडीला १७० पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा आहे.
त्यानंतर, शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू, एनसीपी’चे नेते धनंजय मुंडे आणि काँग्रेसतर्फे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे सरकारचा विश्वासदर्शक ठराव मांडतील. हा ठराव मंजूर झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल. रविवारी सकाळी ११ वाजता पुन्हा विधानसभेचे अधिवेशन भरेल. तत्पूर्वी अध्यक्षांची निवड केली जाईल. विरोधी पक्षनेत्याची निवड होईल. दुपारी ४ वाजता राज्यपालांचे अभिभाषण पटलावर ठेवण्यात येईल. त्यानंतर, अधिवेशन संस्थगित होईल.
