राष्ट्रवादीपुढे भाजपनीती फिकी? उद्धव ठाकरेंचा विधानपरिषदेवरील मार्ग मोकळा होणार?
मुंबई, २७ एप्रिल : राज्यावर कोरोनाचे महासंकट उभे ठाकले आहे. या संकटाशी तोंड देताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर आमदारकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्री जाईल की राहील अशी राजकीय चर्चा रंगली आहे. राज्यपालांनी जर याबद्दल कोणताही निर्णय घेतला नाहीतर महाविकास आघाडी सरकार नवीन पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे.
यापूर्वी ९ एप्रिलला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांची राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधानपरिषदेवर नियुक्ती करण्याबाबत ठराव मंजूर झाला होता. मात्र, उपमुख्यमंत्रीपद हे वैधानिक पद नसल्याचे कारण पुढे करत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हा ठराव ग्राह्य धरण्यास नकार दिला होता.
राज्य मंत्रिमंडळातील काही प्रमुख मंत्र्यांची आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत राज्यातील कोरोना संदर्भात आढावा तसंच संचारबंदीबाबत पुढे काय करणार यावर चर्चा होणार आहे. तसंच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राज्यपाल नियुक्त आमदार यासाठी मंत्रिमंडळ पुन्हा शिफारस प्रस्ताव आणावा का संदर्भात चर्चा अपेक्षित असल्याचे सांगितले जात आहे. भाजपने कोरोना आपत्तीत उद्धव ठाकरेंना गोत्यात आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या राजकीय, संविधानिक तसेच प्रशासकीय अनुभवापुढे भाजपची हवा गुल होतं आहे अशी चर्चा आहे.
मंत्रिमंडळाची बैठक कोणाच्या अध्यक्षतेखाली घ्यायची, हे ठरवण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांना आहेत. त्यामुळे अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार्या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्याबाबत मंजूर केल्या जाणार्या प्रस्तावाला आक्षेप घेता येणार नाही. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीदेखील उद्धव ठाकरेंच्या नियुक्तीसाठी कॅबिनेट नोट आणून प्रस्ताव द्या, असा पर्याय सुचवला आहे. परिणामी उद्धव ठाकरे यांच्या विधानपरिषदेवरील नियुक्तीचा मार्ग मोकळा होईल.
News English Summary: The Chief Minister has the power to decide under whose chairmanship the Cabinet meeting should be held. Therefore, in the meeting to be held under the chairmanship of Ajit Pawar, the proposal to be approved regarding Uddhav Thackeray cannot be objected to. Governor Bhagat Singh Koshyari has also suggested bringing a cabinet note for the appointment of Uddhav Thackeray. As a result, the way will be clear for the appointment of Uddhav Thackeray to the Legislative Council.
News English Title: Story New plan of Mahavikas Aghadi for CM Uddhav Thackerays at Mumbai News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा