4 May 2024 4:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर BHEL Share Price | भरवशाचा PSU शेअर! अल्पावधित दिला 258% परतावा, कंपनीबाबत अजून एक सकारात्मक अपडेट Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीचा मोठा निर्णय, 1 वर्षात 414% परतावा देणारा स्टॉक कोसळणार की तेजीत येणार? Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर पुढे किती फायद्याचा ठरणार? तेजीत येणार? Buy करावा की Sell? Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरची घसरण थांबेना! स्टॉक नेमका घसरतोय का? तपशील जाणून घ्या
x

परळीत फक्त धनंजय मुंडे! महाविकास आघाडीच्या परळीत पहिल्या सरपंच

NCP Leader Dhananjay Munde, Beed Parli, BJP Leader Pankaja Munde, MahaVikas Aghadi

परळी: परळी विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या दिग्गज नेत्या पंकजा मुंडे यांना विधानसभा निवडणुकीत पराभूत केल्यानंतर राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे अजून स्थानिक पातळीवरील राजकीय धक्के देणं सुरूच ठेवलं आहे. मात्र, अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे येथील स्थानिक सरपंच पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची एकी पहिल्यांदा पाहायला मिळाली आहे.

शिरसाळा ग्रामपंचाय निवडणुकीत राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेने एकंच उमेदवार दिला होता आणि त्याचा फटका पंकजा मुंडेंच्या गटाला बसला आहे. विशेष म्हणजे परळीत महाविकास आघाडीच्या सरपंच पहिल्यांदाच निवडून आल्या आहेत. त्यामुळे भविष्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत असे प्रयोग केले गेल्यास भारतीय जनता पक्षाची डोकेदुखी वाढणार असल्याचं म्हटलं जातं आहे.

स्थानिक स्वराज संस्थांमधील ग्रामपंयात निवडणुकींतून महाविकास आघाडीचा पहिला सरपंच निवडून आला आहे. आमदार धनंजय मुंडेंच्या मतदारसंघातील शिरसाळा ग्रामपंचायतीवर हा विजय मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना या महाविकास आघाडीच्या उमेदवार आश्रूबाई विश्वनाथ किरवले यांना पहिल्या सरपंच पदाचा मान मिळाला आहे. धनंजय मुंडेंनी याबाबत ट्विट करुन आश्रुबाईंचे अभिनंदन केले आहे. तसेच, परळी मतदारसंघातून महाविकास आघाडीचा पहिला सरपंच निवडून आल्याचा मला अभिमान आहे, असेही त्यांनी म्हटलंय.

एका बाजूला परळीत स्थानिक पातळीवर या घाडामोडी घडत असताना दुसरीकडे भाजपच्या मराठवाडा विभागीय बैठकीला माजी मंत्री पंकजा मुंडे या उपस्थित राहणार नसल्याचं वृत्त आहे. तसेच १२ डिसेंबरला त्या मोठा राजकीय निर्णय घेणार असल्याचं म्हटलं जातं असून मराठवाड्यात भाजपाची डोकेदुखी वाढली आहे.

 

NCP Leader Dhananjay Munde Defeat BJP Candidate First Sarpanch Elected at Pankaja Munde Parli Constituency with Alliance of Mahavikas Aghadi

हॅशटॅग्स

#Dhananjay Mundey(51)#Pankaja Munde(80)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x