5 May 2024 9:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

उद्या खडसेंची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी भेट झाल्यास भाजपाला जय महाराष्ट्र निश्चित होणार

BJP Senior Leader Eknath khadse, Chief Minister Uddhav Thackeray

मुंबई: भाजपत ओबीसी नेते नाराज असून या पक्षाचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे आपल्याला भेटले अशी माहिती राष्ट्रवादी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी आज नाशिक येथे पत्रकारांना दिली. मंत्रीपदी निवड झाल्यानंतर आज प्रथमच भुजबळ यांचे नाशिकमध्ये आगमन झाले. त्यानंतर भुजबळ फार्म येथे त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.

भाजपाचे नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या दिल्लीतील ६ जनपथ निवासस्थानी पोहोचले आहेत. एकनाथ खडसे भाजपामध्ये नाराज असून वेळोवेळी त्यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे. एकनाथ खडसे हे भाजपा नेत्यांच्या भेटीसाठी दिल्लीत आल्याची चर्चा होती. पण त्याऐवजी ते शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत.

दरम्यान, उद्या खडसे हे मुंबईमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील भेटणार आहेत. खडसे यांच्या विरोधक नेत्यांशी वाढत्या भेटीमुळे ते काही वेगळा निर्णय घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. महत्वाची बाब म्हणजे खडसे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची भेट न घेताच मुंबईकडे रवाना होत आहेत. त्यामुळे आता खडसेंचा वेगळा निर्णय म्हणजे शिवसेना प्रवेश असेल का? अशी चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीमुळे एकनाथ खडसे भाजपाला जय महाराष्ट्र करणार हे जवळपास निश्चित झाल्याचं राजकीय विश्लेषकांनी म्हटलं आहे.

मागच्याच आठवडयात त्यांनी ओबीसी समाजाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांना पराभूत करण्यात आल्याचा आरोप केला होता. दुर्देवावे बहुजन समाजाला जाणीवपूर्वक डावलण्याचा प्रयत्न होतोय असे देखील म्हटले होते. तत्पूर्वी, मला जाणीवपूर्वक छळण्यात आलं. मंत्रिमंडळातून बाहेर काढताना जगाला न पटणारे आरोप केले. दाऊदच्या बायकोशी संबंध जोडले. विधानसभेला तिकीट नाकारलं. शिवाय मुलीला तिकीट देऊन स्वत:च्या पक्षातील लोकांनी जाणीवपूर्वक पाडले,” असा हल्लाबोल भाजप नेते एकनाथ खडसे यांनी केला.

त्यानंतर काल कर्नाटक एक्सप्रेसनं ते दिल्लीसाठी रवाना झाले आणि आज सकाळी दिल्लीत पोहचले आहेत. एकनाथ खडसे हे पक्षाच्या बैठकीसाठी दिल्लीत दाखल झाले असल्याचं पेरण्यात आलं असलं तरी ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाच भेटून मोठा राजकीय भूकंप करण्यास असल्याचं वृत्त आहे. स्वतः फडणवीस मुख्यमंत्री विदर्भातील असताना देखील भाजपाला विदर्भात मोठा राजकीय फटका बसला आहे. त्यात मराठवाड्यात देखील पंकजा मुंडेंसारख्या दिग्गज नेत्या पराभूत झाल्या असून मराठवाड्यात देखील भविष्यात मोठे राजकीय फटके बसून, उत्तर महाराष्ट्रात देखील भाजप खिळखिळी करण्याची व्यूहरचना राष्ट्रवादी आखात असल्याचं वृत्त आहे. विशेष म्हणजे मोठ्या राजकीय बाता करणारे उत्तर महाराष्ट्रातील भाजप नेते गिरीश महाजन देखील स्वतःच्या मतदासंघापुरते मर्यादित असल्याचं निकालानंतर स्पष्ट झाल्याने भाजपमध्ये अंतर्गत चिंता वाढल्याचं वृत्त आहे.

हॅशटॅग्स

#Eknath Khadse(94)#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x