15 December 2024 10:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा
x

३२८ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ३,६४८ वर

Covid 19, Corona Crisis, Maharashtra

मुंबई, १८ एप्रिल: मागील दोन दिवसांमध्ये कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे जरा कुठे उसंत मिळेल असे वाटत असतानाच शनिवारी मुंबईत या व्हायरसने पुन्हा उसळी घेतली. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, मुंबईत शनिवारी कोरोनाचे आणखी १८४ रुग्ण आढळून आले. मुंबईत एकाच दिवसात इतके रुग्ण सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे.

यामध्ये शहरातील कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत असलेल्या धारावीतील १६ रुग्णांचा समावेश आहे. पालिका प्रशासनाकडून मुंबईतील आठ वॉर्डमध्ये अतिगंभीर परिस्थिती असल्याचे यापूर्वीच सांगण्यात आले होते.तर राज्यातही आज कोरोनाचे ३२८ नवे रुग्ण आढळून आले. यामध्ये पुण्यातील ७८ नव्या रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा ३,६४८ इतका झाला आहे.

राज्यातील कोरोना विषाणूचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी राज्य सरकारडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटरच्या माध्यमातून कोरोनाबाधितांसाठी पूर्वीपेक्षा अधिक खाटा (बेड) उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती दिली आहे. राज्यातील वैद्यकीय शिक्षण विभागाच्या पुणे, बारामती, सोलापूर, कोल्हापूर, नागपूर, यवतमाळ, अकोला, गोंदिया, चंद्रपूर, धुळे, लातूर, नांदेड, मिरज, औरंगाबाद, जळगाव आणि अंबाजोगाई येथील वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयात एकूण ३७२५ खाटा कोरोना बाधीतांसाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

महापालिका आणि जिल्हानिहाय आकडेवारी:

 

News English Summary: The virus has recovered in Mumbai on Saturday, as it looks to be getting a little bit of Corona’s new patient population in the last two days. According to Health Department data, 184 more Corona patients were found on Saturday in Mumbai. This is the first time in Mumbai to find so many patients in one day.

News English Title: Story Mumbai sees the highest number of Covid19 cases today as 184 people tested positive Covid 19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x