14 May 2021 3:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
दिल्लीकरांसाठी देवदूत ठरलेल्या बी श्रीनिवास यांच्याविरोधात क्राईम ब्रांच फेरा | मोदी सरकारविरोधात काँग्रेसचा संताप 91.6 टक्के परिणामकारक रशियन स्पुतनिक लसीची भारतातील प्रति डोस किंमत 995 रुपये तुमच्या तिथे चहात बिस्किटं बुडत असतील, आमच्याकडे चहातंच पूर्ण देश बुडाला - काँग्रेस प्रभू श्रीरामाच्या अयोध्येत ऑक्सिजन अभावी लोक मरत आहेत, पंतप्रधान, गृहमंत्री गायब - संजय राऊत कोरोना आपत्ती | जाहीर आकडेवारी पेक्षा भारत आणि मेक्सिकोमध्ये दुप्पट मृत्यू - अमेरिकन इंस्टीट्यूटचं विश्लेषण राज्य सरकारचं शिष्टमंडळाने राज्यपालांना भेटलं, पंतप्रधानांची वेळ मागणार असल्याचे जाहीर होताच.... मराठा आरक्षण | केंद्राकडून सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल
x

मंत्रिमंडळात भावाला स्थान न मिळाल्याने संजय राऊतांचं नाराजी नाट्य

Shivsena MP Sanjay Raut, MLA Sunil Raut, CM Uddhav Thackeray

मुंबई : महाविकास आघाडीच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या शिवसेनेच्या मंत्र्यांची यादी समोर आली आहे. अनिल परब, उदय सामंत, अब्दुल सत्तार यांच्यासह १३ जण मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मात्र शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांचे धाकटे बंधू आमदार सुनील राऊत राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. मंत्रिपद न मिळाल्यामुळे ते आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे बंधू आणि आमदार सुनील राऊत मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज असल्याची माहिती होती. सुनील राऊत यांना उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र ते स्थान न मिळाल्याने आणि त्याची कुणकुण लागल्यानेच संजय राऊत या शपथविधी सोहळ्याला गैरहजर राहिले अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

संजय राऊत मंत्रिमंडळाच्या विस्तारावर म्हणाले की, एक चांगले आणि अनुभवी असलेलं मंत्रिमंडळ असून चांगलं काम करून राज्याला दिशा देईल. सुनिल राऊत यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं नसल्याने आमच्या घरातील कोणीही नाराज नाही. सरकार स्थापन करण्यात आम्हाला महत्वाची भूमिका निभावता आली. त्यातचं आम्ही समाधानी आहोत. दुसरीकडे खासदार संजय राऊत यांनी मी अशा मंत्रिमंडळांच्या शपथविधीला उपस्थित राहत नसतो, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

 

Web Title:  Shivsena MP Sanjay Raut Absent during CM Uddhav Thackeray Cabinet Oath-because Brother MLA Sunil Raut not got Cabinet Ministry.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(215)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x