तुमचे वडील कंगना, अर्णब, अन्वय नाईक प्रकरणावर खूप बोलतात | असं ED अधिकाऱ्यांनी मुलांना विचारलं

मुंबई, २५ नोव्हेंबर: शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर ईडीने मंगळवारी सकाळी छापे मारले. यानंतर त्यांचा मुलगा विहंग याला ताब्यात घेत जवळपास सहा तास चौकशी केली. यानंतर ईडीने सरनाईकांना समन्स बजावले असून आज सकाळी 11 वाजता चौकशीला ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहेत.
दरम्यान, सरनाईक हे परदेशात असल्याचे सांगितले जात होते. मात्र, ते मुंबईत आहेत. यामुळे सरनाईक आज ईडीच्या चौकशीला सामोरे जाणार आहेत. तर त्यांचा मुलगा विहंगला आज पुन्हा ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. ज्या दिवशी अर्णब गोस्वामी, कंगना राणावत यांच्यावर हक्कभंग दाखल केला. अन्वय नाईक प्रकरणाचा तपास पुन्हा सुरु करायला लावला. त्याच दिवशी उद्या काय होणार याचा प्रताप सरनाईकने विचार केला होता. आम्ही संघर्ष करत इथपर्यंत पोहोचलो आहोत. शिवसेना आणि उद्धव ठाकरेंनी मला आमदार केलं. एका पक्षाचा लोकप्रतिनिधी म्हणून त्या पक्षाची धोरणं, भूमिका प्रसारमाध्यमांसमोर स्पष्ट करणं ही माझी जबाबदारी आहे,” असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे.
ईडीचे लोक माझ्या मुलांना तुमचे वडील कंगना, अर्णब, अन्वय नाईक प्रकरणावर खूप बोलत असल्याचं विचारत होते असं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं आहे. “या देशात, राज्यात महाराष्ट्राची, मुंबई पोलिसांची बदनामी होत असेल तर अशा गोष्टींवर प्रताप सरनाईक बोलणार. प्रताप सरनाईकचं तोंड ईडीची धाड पडली म्हणून बंद होणार नाही. या महाराष्ट्रासाठी, देशासाठी, मुंबईसाठी फाशी दिली तरी ती स्वीकारायची तयारी आहे. मी कोणत्याही आर्थिक गुन्ह्यात अडकलेलो नाही. जो अडकलेला नसतो तोच विरोधकांना अशा ठामपणे उत्तर देत असतो. भविष्यात असे अजून प्रसंग आले तरी समोर जाण्याची तयारी आहे,” असं प्रताप सरनाईक म्हणाले आहेत.
ईडीच्या लोकांनी माझं ऑफिस, घरी सगळीकडे चौकशी केली, कागदपत्रं ताब्यात घेतली. मी गेल्या ३० वर्षांपासून बांधकाम आणि हॉटेल व्यवसायात आहे. त्याची रितसर कागदपत्रं आहेत. ईडीच्या लोकांना माझे कर्मचारी, मुलं यांनी माहिती दिली आहे. त्यातही त्यांचं समाधान झालं नाही. ज्यावेळी ते मला बोलावलील प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची माझी जबाबदारी आहे. मी त्यांच्या प्रश्नानां उत्तर देण्यात समर्थ आहे,” असं प्रताप सरनाईकांनी म्हटलं आहे.
News English Summary: The ED raided the house and office of Shiv Sena MLA Pratap Saranaik on Tuesday morning. He then detained his son Vihang and interrogated him for about six hours. After this, the ED has issued summons to Sarnaik and asked him to be present at the ED’s office at 11 am today.
News English Title: Shivsena MLA Pratap Sarnaik made allegations over ED officers news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Moschip Technologies Share Price | 10 रुपयाच्या पेनी शेअरने 3 वर्षात 481 टक्के मल्टीबॅगर परतावा दिला, आजही शेअर खरेदीला स्वस्त
-
Budh Rashi Parivartan 2023 | बुध राशी परिवर्तन होतंय, 7 जूनपर्यंत या राशींना करिअरमध्ये मोठं यश आणि आर्थिक बळ मिळेल
-
Expleo Solutions Share Price | एक्स्प्लेओ सोल्युशन्स शेअर तेजीत, 3 वर्षांत गुंतवणूकदारांना 740 टक्के परतावा दिला, फायदा घेणार?
-
Inox Wind Share Price | आयनॉक्स विंड शेअरमध्ये तुफानी वाढ, मागील एका महिन्यात 30.18 टक्के परतावा दिला, तेजीचे कारण काय?
-
Carysil Share Price | मालामाल होण्याची मोठी संधी! 96503 टक्के परतावा देणारा कॅरीसिल शेअर अजून 40 टक्के परतावा देऊ शकतो
-
MM Forgings Share Price | मल्टिबॅगर शेअर! एमएम फोर्जिंग्ज शेअरने तब्बल 4900 टक्के परतावा दिला, प्लस डिव्हीडंड मिळणार
-
Coal India Share Price | भारत सरकार कोल इंडियामधील हिस्सा विकणार, शेअरवर याचा काय परिणाम होणार? सविस्तर डिटेल्स जाणून घ्या
-
Hikal Share Price | हिकल लिमिटेड शेअरच्या गुंतवणूकदारांना मजबूत डिव्हीडंड मिळणार, स्टॉक डिटेल्स जाणून घ्या
-
Sterling Tools Share Price | मल्टीबॅगर स्टर्लिंग टूल्स शेअरचा गुंतवणूकदारांना 105% परतावा, आता 100% डिव्हीडंड देणार, स्टॉक डिटेल्स पहा
-
Eureka Forbes Share Price | कमाई जोमात! युरेका फोर्ब्स शेअरने 5 दिवसात 26 टक्के परतावा दिला, तुम्ही सुद्धा अल्पावधीत कमाई करणार का?