12 December 2024 7:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याचं अनावरण | राज ठाकरेंना देखील आमंत्रण

Mumbai Mayor Kishori Pednekar, Raj Thackeray

मुंबई, १९ जानेवारी: मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. 23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशी दक्षिण मुंबईत पोलीस मुख्यालयसमोर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा बसवण्यात येणार आहे. याच सोहळ्याचं निमंत्रण देण्यासाठी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.

मुंबई महापालिकेनं कुलाब्यात बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा उभारला आहे. या पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची भेट होऊ शकते. याआधी दीड वर्षांपूर्वी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची भेट झाली होती. शिवाजी पार्कमध्ये उद्धव यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या सोहळ्याचं आमंत्रण राज ठाकरे यांना देण्यात आलं होतं.

 

News English Summary: Mumbai Municipal Corporation has erected a statue of Balasaheb Thackeray in Colaba. The statue will be unveiled by Chief Minister Uddhav Thackeray. Uddhav Thackeray and Raj Thackeray may meet in this program. Raj Thackeray and Uddhav Thackeray had met a year and a half ago. Uddhav was sworn in as the Chief Minister at Shivaji Park. Raj Thackeray was invited to the ceremony.

News English Title: Mumbai Mayor Kishori Pednekar meet Raj Thackeray to give invitation news updates.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x