3 May 2024 4:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Stocks To Buy | सुवर्ण संधी! तज्ज्ञांनी निवडले टॉप 5 शेअर्स, झटपट 45 टक्केपर्यंत कमाई होईल
x

टाइम्सनाऊ'वर अर्नबचा 'गिधाड' असा उल्लेख | अर्थात देशासाठी नव्हे तर वयक्तिक खुन्नस

Navika Kumar, Arnab Goswami, called Vulture, Times Now

मुंबई, १९ जानेवारी: अर्णब गोस्वामी आणि पार्थो दासगुप्ता यांच्यादरम्यानच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅट प्रकरणानंतर काही वृत्त वाहिन्या आणि विशेष करून रिपब्लिकच्या मुख्य स्पर्धक वृत्तवाहिन्या आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामध्ये टाइम्सनाऊ, इंडिया टीव्ही आणि इंडिया टुडेच समावेश आहे.

त्यात सर्वाधिक टाइम्सनाऊ आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. टाइम्सनाऊच्या संपादिका नाविका कुमार यांनी वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमादरम्यान अर्णब गोस्वामी यांचा थेट ‘गिधाड’ असा प्रयोग केला. त्यानंतर काँग्रेसने देखील यावर समाज माध्यमांवर समर्थन करत अर्णब गोस्वामी यांची खिल्ली उडवली आहे. याबाबत ट्विट करताना काँग्रेसचे नेते श्रीवत्सा यांनी म्हटलं की, “नाविका अर्णब गोस्वामी यांना आज टाइम्सनाऊ वाहिनीवर ‘गिधाड’ म्हणाल्या….असा कचरा केल्याबद्दल रिया चौधरी देखील मनापासून हसली असावी. मात्र पुढे त्यांनी दुसरं ट्विट करताना असं देखील म्हटलं आहे की, “अर्थात….देशासाठी नव्हे…ते अर्णबचा वयक्तिक स्वार्थसाठी तिरस्कार करतात..

दुसरीकडे रिपब्लिकचे सर्वेसेवा अर्णब गोस्वामी आणि पार्थो दासगुप्ता यांच्यादरम्यानच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅट प्रकरणाचा रिपब्लिक टीव्हीला फटका बसण्याची शक्यता आहे. गोस्वामी व पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल झाल्यानंतर एनबीएने टीव्ही रेटिंगवरून ‘बार्क’वर ताशेरे ओढले आहेत. त्याचबरोबर रिपब्लिक टीव्हीचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी दूरचित्रवाणी वाहिन्यांची देशातील शिखर संस्था असलेल्या ‘आयबीएफ’कडे केली आहे.

टीआरपी घोटाळ्याचा तपास सुरू असताना अर्णब गोस्वामी व बार्कचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअ‍ॅप चॅट सोशल मीडियातून व्हायरल झालं. या चॅटमधून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. गोस्वामी-दासगुप्ता यांच्यातील चॅटवर एनबीएने आश्चर्य व्यक्त केलं आहे. इंडिया टीव्हीचे चेअरमन आणि मुख्य संपादक रजत शर्मा हे एनबीएचे अध्यक्ष आहेत. रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी आणि बार्कचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांच्यात मिलीभगत होती, असा आरोप एनबीएने केला आहे.

 

News English Summary: Following the WhatsApp chat case between Arnab Goswami and Partho Dasgupta, some news channels, especially the Republic’s main rival news channels, have become aggressive. These include TimesNow, India TV and India Today.

News English Title: Navika Kumar called Arnab Goswami as a Vulture on Times Now news updates.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x