17 April 2021 2:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
कडक संचारबंदीत लोक शिवथाळी खायला जाणार कसे? | पण शिवथाळीसाठी गर्दी | राम कदम तोंडघशी Alert | हवेतून वेगाने पसरतो कोरोना, 3 देशांतील तज्ञांना याचा ठोस पुरावा सापडला - लँसेट जर्नल १९-२० एप्रिल नंतर रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत होईल - डॉ. राजेंद्र शिंगणे Alert | एकूण रुग्णांपैकी 10% रुग्ण 11 ते 19 वयोगटातील तर 4.42% रुग्ण 10 वर्षांपेक्षा कमी वयाचे केंद्राची कोविड रणनीती, पहिला टप्पा लॉकडाउन, दुसरा टप्पा घंटी वाजवणे, तिसरा टप्पा देवाचे गुण गा प्रेतं जळत होती तेव्हा साहेब निवडणुकीत 'जुमलेबाजी' करत होते... इतिहास साक्ष देईल - काँग्रेस महाराष्ट्र एकीकरण समितीविरोधात प्रचार करून भाजप मराठी भाषिकांसोबत नाही हे सिद्ध झाले आहे
x

#VIDEO - अर्थतज्ज्ञांच्या सूचनांकडे दुर्लक्ष आणि सदगुरूंच्या विचारांचा मोदींकडून प्रचार

PM Narendra Modi

नवी दिल्ली: सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात अजूनही देशाच्या वेगवेगळया भागांमध्ये आंदोलने सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर मोहिम सुरु केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सदगुरु जग्गी वासुदेव यांचा सीएए कायद्याचे समर्थन करणारा विस्तृत विश्लेषणाचा व्हिडीओ टि्वट केला आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

जग्गी वासुदेव यांनी या व्हिडीओमध्ये सीएए कायद्याबद्दलचे वेगवेगळे पैलू उलगडून सांगितले आहेत. ऐतिहासिक संदर्भ देताना बंधुभावाच्या संस्कृती त्यांनी उत्तमरित्या उलगडल्याचे मोदींनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

विशेष म्हणजे देश विदेशातील अर्थतज्ज्ञांनी अर्थव्यवस्थेच्या बाबतीत दिलेल्या सूचनांकडे कानाडोळा करणारे पंतप्रधान नाणेंद्र मोदी महाराज आणि सद्गुरुंच्या प्रवचनांकडे गांभीर्याने पाहत असल्याचं त्यामुळे अधोरेखित होतं आहे. तसेच सामान्य लोकांना आर्थिक मंदी, महागाई, बेरोजगारी आणि इतर गंभीर समस्यांपासून विचलित करण्यासाठी मोदी सरकार असले फंडे अमलात आणत असल्याचा आरोप यापूर्वीच विरोधकांनी केला आहे आणि त्याचंच हे उदाहरण असल्याचं विरोधकांनी म्हटलं आहे.

दरम्यान, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला शांततेच्या मार्गाने विरोध सुरू ठेवणार असल्याचे अलिगड विद्यापीठाच्या (एएमयू) विद्यार्थ्यांनी सांगितले आहे. विद्यार्थ्यांच्या समन्वय समितीच्या कार्यकारिणी सदस्यांची शनिवारी बैठक झाली. त्या वेळी ‘सीएए’च्या विरोधातील आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात आली. त्यानंतर समितीच्या प्रवक्त्याने सांगितले, की सोमवारपासून रोज सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत विद्यार्थी ‘बाब-ए-सईद’ प्रवेशद्वाराजवळ ठिय्या देतील. दरम्यान, जे विद्यापीठाचे विद्यार्थी नसूनही आंदोलनात सहभागी होत आहेत, अशांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांनी विद्यापीठ प्रशासनाला दिल्या आहेत.

 

Web Title:  Prime Minister Narendra Modi Launches Outreach Campaign Tweets Sadhguru Video.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1483)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x