बंगळूर: कर्नाटकातील कनसेच्या नेत्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना गोळ्या घालण्याचे वक्तव्य केल्याचे पडसाद आता सीमाभागात उमटू लागले आहेत. तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने शनिवारी सायंकाळपासून दोन्ही राज्यांदरम्यानची बससेवा बंद करण्यात आली होती.

या वादावर आज येडीयुराप्पा यांनी भाष्य केले असून महाराष्ट्राला एक इंचही जमीन देणार नसल्याचे म्हटले आहे. महाजन कमिशनच्या निर्णयानुसार कोणता भाग महाराष्ट्राला द्यायचा आणि कोणता कर्नाटकला हे स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे अशाप्रकारचा वाद निर्माण करणे योग्य नाही, असे ते म्हणाले.

कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या अध्यक्षाच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे बेळगाव आणि महाराष्ट्रात तणाव निर्माण झाला. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांवर गोळ्या घातल्या पाहिजेत असे वक्तव्य कर्नाटक नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष पाटील यांनी केले होते. दोन्ही बाजूंना तणावाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे शनिवारी संध्याकाळपासून दोन्ही राज्यांदरम्यानची बससेवा स्थगित करण्यात आली आहे.

दरम्यान, शिवसेना या वादावर आक्रमक झालेली असताना शिवसेनेच्या खासदारांनी देखील आक्रमक भूमिका घेत कर्नाटकातील नेत्यांना दम भरला होता. एका बाजूला कर्नाटकात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुतळे जाळण्यात आल्यानंतर त्याला शिवसेनेने देखील प्रतिउत्तर देत महाराष्ट्रात येडीयुराप्पा यांचे पुतळे जाळण्यात आले होते.

मात्र एकाबाजूला एकसूट शिवसेनेला लक्ष करणारे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि देवेंद्र फडणवीस सध्या मूग गिळून शांत आहेत. कारण कर्नाटकात भारतीय जनता पक्षाची सत्ता असल्याने तिथे राजकीय अडचणी येऊ नयेत म्हणून सर्व भाजप नेते मूग गिळून शांत आहेत आणि महाराष्ट्राचा अपमान सहन करत असल्याची भावना सीमाभागात व्यक्त करण्यात येत आहे.

 

Web Title:  Karnataka Government will not give even single inch Land BS Yeddyurappa told Maharashtra Belgaum border dispute.

बेळगाव: महाराष्ट्राला एक इंचही जागा देणार नाही; कर्नाटक भाजप सरकारने ठणकावलं