12 October 2024 2:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Login | पगारदारांनो, तुम्ही गरजेच्या वेळी EPF मधून पैसे काढता, नवा नियम लक्षात घ्या, होतं खूप मोठं नुकसान - Marathi News Post Office Scheme | महिलांनो पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवा आणि 32,000 रुपयांपर्यंत व्याज मिळवा, जाणून घ्या योजनेविषयी Post Office Interest Rate | पोस्ट ऑफीसची खास योजना, बचतीवर व्याजानेच कमवाल 2 लाख रुपये, फायदाच फायदा - Marathi News Credit Card | क्रेडिट कार्ड घेण्याआधी स्वतःला विचारा हे प्रश्न, नुकसान होणार नाही आणि मिळतील अनेक फायदे - Marathi News EPFO Passbook | पगारातून EPF चे पैसे कापले जातात, असा घ्या फायदा, EPF खात्यात जमा होतील 3 ते 5 करोड - Marathi News Shukra Rashi Parivartan | शुक्र राशी परिवर्तन, या 6 राशींच्या लोकांचा गोल्डन टाईम सुरु होतोय, तुमची राशी कोणती - Marathi News Gold Rate Today | बापरे, दसऱ्याच्या एक दिवस आधी सोन्याचे भाव वाढले, तुमच्या शहरातील आजचे नवे दर जाणून घ्या - Marathi News
x

मुख्यमंत्री शिंदेंवर भूखंड घोटाळ्याचा गंभीर आरोप, 86 खोक्यांचा भुखंड फक्त 2 खोक्यांना दिल्याचा आरोप

CM Eknath Shinde

CM Shinde Accused of Plot Scam | हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी जोरदार आघाडी घेतली. पहिल्या दिवशी महाविकास आघाडी बॅकफूटवर असल्याचं दिसून आलं होतं. त्यानंतर आता विधान परिषदेत महाविकास आघाडी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना निशाण्यावर घेतलं. त्यावेळी विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भूखंड घोटाळ्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला आहे. याबद्दल मुख्यमंत्री शिंदेंनी सभागृहात स्पष्टीकरण दिलं आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जोरदार पाठराखण करत विरोधकांनी उत्तर दिले आहे.

एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री असताना NIT चा 86 कोटींचा भुखंड अवघ्या 2 कोटींना दिल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. मुख्यमंत्री असताना या निर्णयाची ऑर्डर काढली असल्याचा आरोपही आव्हाड यांनी केला. शिंदेंच्या निर्णयानंतर कोर्टाने यावर ताशेरे ओढले. त्यामुळे आज विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

भुजबळ सुद्धा आक्रमक :
दरम्यान, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 83 कोटी रुपयांचा भूखंड केवळ 2 कोटींना दिला, असा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. आपलं सभागृह देखील सर्वात मोठं आहे. येथं लोकप्रतिनिधी सर्वात जास्त आहेत. त्यामुळे 83 कोटींचा भूखंड अवघ्या 2 कोटींत कसा दिला? हा भ्रष्टाचार नाही का? की यांनीही रेवड्या वाटल्या?, असा सवाल राष्ट्रवादीचे आमदार छगन भूजबळ यांनी उपस्थित केला आहे.

फडणवीसांकडून सारवासारव
तर, हा भूखंडाचा विषय नाही, हा गुंठेवारीचा आहे. 17 जुलै 2007 रोजी विलासराव देशमुख यांनी हा निर्णय घेतला होता. 49 लेआऊटपैकी 16 शिल्लक राहिले. यात 2009 आणि 2010 मध्ये सुद्धा शासन आदेश निघाला, असा दावा फडणवीस यांनी केला.

दरम्यानच्या काळात एक जनहित याचिका झाली. न्यायालयाने एक समिती गठीत केली. नासुप्रने न्यायालयीन वस्तुस्थिती तत्कालीन मंत्र्यांना लक्षात आणून द्यायला हवी होती. पण तसे झाले नाही. मंत्र्यांनी त्यामुळे निर्णय दिला. त्यामुळे न्यायालयाने आपले निरीक्षण नोंदविले, असंही फडणवीस यांनी सांगितलं. न्यायालयाने कुठेही ताशेरे ओढलेले नाही. जर वृत्तपत्रात आलेली बातमी खरी असेल तर ‘जैसे थे’ स्थिती राखण्यात यावी, असे सांगितले. 16 भूखंड नियमितीकरण रद्द करून त्याचा अहवाल न्यायालयाला सादर करण्यात आला आहे. न्यायालयाने सांगितलेली कार्यवाही पूर्ण केली आहे, असंही फडणवीस म्हणाले.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: CM Shinde Accused of Plot Scam by oppositions check details on 20 December 2022.

हॅशटॅग्स

#CM Eknath Shinde(90)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x