28 June 2022 5:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Home Loan Top-Up | कर्जाच्या ईएमआयने घराशी संबंधित खर्च भागत नाही? | टॉप-अपचा पर्याय निवडा RD Vs SIP | या 2 पर्यायांपैकी कशामध्ये दर महिन्याला रु. 2000 गुंतवणूक करणे अधिक योग्य आहे | फायद्याचं गणित जाणून घ्या Maharashtra Govt Recruitment | महाराष्ट्र पोलीस भरती संबंधित नवीन जीआर प्रसिद्ध | संपूर्ण GR वाचा शिवसेना पूर्णपणे संपविण्यासाठी दिल्लीत जोरदार बैठका | आता शिंदेंवर सेनेचे खासदार फोडण्यासाठी दबाव वाढवला? शिंदेसोबत बैठकीसाठी फडणवीस दिल्लीला | सोबत वकिल महेश जेठमलानी सुद्धा | शिंदे गट कायद्याच्या कचाट्यात एकनाथ शिंदे गट कायदा आणि घटनात्मक चौकटीत फसतोय | शिंदे भाजप नेत्यांसोबत बैठकीसाठी दिल्लीत Multibagger Stocks | 3 वर्षांत 190 टक्के रिटर्नसह 250 टक्के लाभांश | हा शेअर तुमच्याकडे आहे?
x

शिवाजी पार्क स्मशानभूमीत कोरोना मृतांवर मोठ्या प्रमाणावर अंत्यसंस्कार, स्थानिक धुराने त्रस्त

Shivaji park, Corona Patients

मुंबई, २२ जून : राज्यात कोरोनाबाधितांसोबत कोरोनाबळींचा आकडाही वाढत चालला आहे. याचा परिणाम आता शहरातील स्मशानभूमीवर होताना दिसत आहे. सातत्याने क्षमतेपेक्षा जास्त कोविड मृतदेहांचे दहन केल्याने दादरमधील शिवाजी पार्क स्मशानभूमीवरचा ताण वाढला आहे. या स्मशानभूमीत दादर आणि परिसराव्यतिरिक्त लांबच्या रुग्णांचाही अंत्यविधी करण्यात येतो. अंत्यविधीवेळी होणाऱ्या धुराचा परिसरातील रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. शिवाय या स्मशानभूमीच्या बाहेर रुग्णवाहिकेच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात याचाही त्रास होत असून अनेकदा सांगूनही प्रशासन ऐकत नसल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. यासाठी शिवाजी पार्कात रहिवाशांनी आज आंदोलन पुकारले.

मुंबईत कोरोनामुळे मृतांची संख्याही वाढत आहे. अशात या स्मशानभूमीच्या बाहेर रुग्णवाहिकेच्या रांगा लागलेल्या असतात. याचा त्रास होत असल्याचं अनेकदा सांगूनही प्रशासन ऐकत नसल्यानं आज 22 जून रोजी सकाळी 10.30 वाजता आंदोलन करण्यात आलं. मृतदेह मोठ्या प्रमाणात शिवाजी पार्कात अंतिम संस्कारासाठी आणले जातायत त्याच्या विरोधात आज स्थानिकांनी आंदोलन केलं.

मुंबईकरांच्या या आंदोलनाला मनसेनेही पाठिंबा दिसा आहे. या राहिवाशांच्या म्हणण्यानुसार, त्यांना धुरामुळे श्वसनाचा त्रास होतो. त्यामुळे इतक्या मोठया संख्येनं इथे अंत्यसंस्कार केले जाऊ नयेत अशी त्यांची मागणी आहे. दरम्यान, स्थानिक रहिवासी यांनी महानगरपालिका प्रशासना विरोधात मूक निदर्शने केली. या आंदोलनाला मनसेने पाठिंबा दिला. प्रशासनाने यातून मार्ग न काढ़ल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे.

 

News English Summary: The cremation of Kovid’s bodies has increased the tension at the Shivaji Park cemetery in Dadar. Apart from Dadar and its environs, long-term patients are also buried in this cemetery. Residents in the area have to bear the brunt of the smoke from the funeral procession.

News English Title: Protest against last rites of Covid 19 Patients at Mumbai Shivaji park crematorium News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x