29 April 2024 5:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 30 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार? IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लागेल लॉटरी, अशी संधी सोडू नका
x

डोंबिवली: लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू; खा. सुप्रिया सुळेंनी संसदेत विषय मांडला होता

Dombivali Local, Dombivali Fast

मुंबई : मुंबई : डोबिवली लोकलच्या गर्दीने आणखी एका प्रवाशाचा जीव घेतला आहे. भरगच्च लोकलमधून पडल्याने एका २२ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. चार्मी पासद असं मृत्यू झालेल्या तरुणीचं नाव आहे. डोंबिवली ते कोपर रेल्वे स्थानकांदरम्यान आज सकाळी ९ च्या सुमारास ही दुर्घटना घडली. दरम्यान, याच डोंबिवली कल्याणच्या लोकल संदर्भातील विषय राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत मांडून लोकांच्या समस्या सरकारने समजून घेऊन त्यांची गैरसोय टाळावी आणि फेऱ्या वाढवाव्या अशी विनंती देखील केली होती.

आज सकाळी डोंबिवली रेल्वे स्थानकाहून ८. ५३ वाजताची सीएसएमटीकडे जाणारी जलद लोकल चार्मीने प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वरून पकडली होती. गर्दी असल्याने तिला लोकल ट्रेनच्या दरवाज्यावर उभं राहण्यासाठी कशीबशी जागा मिळाली. तरी देखील ती आत शिरण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, कोपर येथे रेल्वेच्या आतून गर्दीचा लोंढा आला आणि दरवाज्यावर उभ्या असलेल्या चार्मीचा तोल गेला.

ती डोंबिवली कोपरदरम्यान धावत्या लोकलमधून पडली. यामुळे तिच्या डोक्याला गंभीर जखमा झाल्या होत्या. तिला तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु, तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित करण्यात आले.

 

Web Title:  Young girl dies in Dombivali Local Rush

हॅशटॅग्स

#SupriyaSule(32)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x