15 December 2024 2:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
x

उन्नाव बलात्कार: माजी भाजपा आमदार कुलदीप सिंग सेंगर न्यायालयाकडून दोषी

Unnao Rape Case, Uttar Pradesh Unnao Rape Case

नवी दिल्ली: देशभर गाजत असलेल्या उन्नाव बलात्कार प्रकरणी भारतीय जनता पक्षाचा माजी आमदार कुलदीप सिंग सेंगर दोषी ठरला आहे. दिल्लीच्या तीसहजारी कोर्टाने आज हा महत्त्वाचा निकाल दिला. सेंगर यांच्यासोबतच शशी सिंहलाही कोर्टाने दोषी ठरवलं असून शिक्षेची सुनावनी १९ डिसेंबरला होणार आहे. उत्तर प्रदेशातल्या सत्ताधारी आमदारानेच बलात्कार केल्याने प्रचंड वाद निर्माण झालं होतं.

उन्नाव येथे २०१७मध्ये एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. आमदार कुलदीपसिंग सेंगर याच्यावर या बलात्काराचा व अपहरणाचा आरोप होता. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार हा खटला लखनऊ येथील कोर्टातून दिल्ली कोर्टात वर्ग करण्यात आला होता. ५ ऑगस्टपासून या खटल्याची दैनंदिन सुनावणी होत आहे. या प्रकरणी सेंगर व सहआरोपी शशी सिंग याच्याविरोधात गुन्हेगारी कट रचणे, अपहरण, बलात्कार आदींशी संबंधित कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले होते.

त्तर प्रदेशमधील बांगरमऊ विधानसभा मतदारसंघातून सेंगर चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आला. सेंगरने २०१७ मध्ये एका युवतीचे अपहरण केल्यानंतर कुलदीप सेंगरने पीडितेने बलात्कार केला होता.त्याशिवाय पाचवी एफआयआर यावर्षी २८ जुलै रोजी साक्ष देण्यासाठी पीडिता अलाहबाद कोर्टात जात असताना रायबरेलीमध्ये तिचा अपघात झाला होता. या अपघातात पीडितेच्या कुटुंबातील दोन महिलांचा मृत्यू झाला होता. अपघातात पीडिता आणि तिचे वकील गंभीर जखमी झाले होते.

 

Web Title:  Uttar Pradesh Unnao Rape Case BJP MLA Kuldeepsingh Sengar Found Guilty by Court.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x