14 June 2024 9:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 14 जून 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 14 जून 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या NBCC Share Price | सरकारी शेअरने अल्पावधीत दिला 900% परतावा, ऑर्डरबुक मजबूत, पुढेही मल्टिबॅगर Reliance Power Share Price | शेअर प्राईस 30 रुपये! 5 दिवसात दिला 34% परतावा, गुंतवणुकीची संधी सोडू नका RVNL Share Price | RVNL स्टॉक देणार ब्रेकआऊट, PSU शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉकबाबत तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, स्टॉक 'BUY' करावा की 'Sell'? Reliance Infra Share Price | स्टॉक रॉकेट स्पीडमध्ये परतावा देणार, 5 दिवसात दिला 30% परतावा, खरेदीला गर्दी
x

गोगोईंना आत्ता जो सन्मान मिळाला आहे, त्याची चर्चा आधीपासूनच सुरु होती: न्या. लोकूर

Rajyasabha, Former CJI Ranjan Gogoi, justice Mdan Lokur

नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टाचे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांची राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राज्यसभेसाठी निवड केलीय. राज्यसभेतले १२ खासदारांची शिफारस राष्ट्रपतींना करता येते. गोगोईंनी ३ ऑक्टोबर २०१८ रोजी सरन्यायाधीश पदाचा कार्यभार स्वीकारला. जवळपास १३ महिने त्यांनी सरन्यायाधीश म्हणून काम केलं.

सरकारनं काढलेल्या अधिसूचनेत केलेल्या उल्लेखानुसार, ‘भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद ८० च्या खंड (३) सोबत पठित खंड (१) च्या उपखंड (क) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करत राष्ट्रपती, एका नामित सदस्याच्या सेवानिवृत्तीच्या कारणानं रिक्त झालेली जागा भरण्यासाठी, राज्यसभेत श्री रंजन गोगोई यांना नामांकीत करत आहेत’. मात्र, सुप्रीम कोर्टातील गोगोई यांचे सहकारी न्या. मदन लोकूर यांनी यावर तिखट शब्दांत टिपण्णी केली आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

न्या. लोकूर यांनी म्हटले की, “माजी सरन्यायाधीश गोगोई यांना आत्ता जो सन्मान मिळाला आहे, त्याची चर्चा आधीपासूनच सुरु झाली होती. त्यातच त्यांना उमेदवारी मिळणं हे आश्चर्यचकीत करणारं नाही. मात्र, हे अगदीच लवकर झालं हे आश्चर्यकारक आहे. ही बाब न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य, निष्पक्षता आणि अखंडतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करतं.” आता शेवटचा स्तंभ देखील कोसळला का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, गोगोई यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवर भाष्य करण्यास न्या. चेलमेश्वर यांनी भाष्य करण्यास नकार दिला आहे.

जानेवारी २०१८ मध्ये सुप्रीम कोर्टाच्या चार सर्वात वरिष्ठ न्यायाधीशांनी एक ऐतिहासिक पाऊल उचलले होते. त्यांनी तातडीने एक पत्रकार परिषद घेत तत्कालीन सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यावर कामाच्या पद्धतीवर अनेक प्रश्न उपस्थित करीत न्यायव्यवस्था धोक्यात असल्याचे म्हटले होते. या न्यायाधीशांमध्ये न्या. रंजन गोगोई, न्या. लोकूर, न्या. चेलमेश्वर आणि न्या. कुरियन जोसेफ यांचा सहभाग होता.

 

News English Summery: Justice Gogoi’s aide in the Supreme Court. Justice Madan Lokur has also commented on it in sharp words. Indian Express has reported. Justice Lokur said, “The honor that Gogoi has received from the former Chief Justice has already begun. It is not surprising that they get their candidacy. However, it is surprising that this happened so soon. This question once again raises questions about the independence, fairness and integrity of the justice system. ” Now the last column also collapsed? He has also raised this question. Meanwhile, comment on Gogoi’s candidacy for Rajya Sabha. Chelmeshwar has refused to comment. In January 2018, the four most senior judges of the Supreme Court made a historic move. He had taken a press conference immediately, raising questions on the mode of work against the then Chief Justice of Deepak Mishra, saying the judiciary was in danger. Take it to the judges. Ranjan Gogoi, justice Lokur, Justice Chelmeshwar and Justice. Kurien Joseph was involved.

 

News English Title: Story supreme court justice Madan Lokur indirectly criticized former CJI Ranjan Gogoi over getting nomination on Rajyasabha.

हॅशटॅग्स

#Supreme Court(138)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x